advertisement

Online Game: इन्स्टाग्रामवर मिळाली लिंक, पैसे डबल करायला गेला, तरुणाचा 40 लाखांचा ऑनलाईन गेम!

Last Updated:

Online Fraud: ऑनलाईन गेमिंगच्या नादात नवी मुंबईतील तरुणाची 40 लाख रुपयांची फसवणूक झालीये. याबाबत अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Online Gaming Scam: ऑनलाईन गेमच्या नादात 40 लाखांना चुना, नवी मुंबईतला तरुण पैसे डबल करायला गेला अन् कसा फसला?
Online Gaming Scam: ऑनलाईन गेमच्या नादात 40 लाखांना चुना, नवी मुंबईतला तरुण पैसे डबल करायला गेला अन् कसा फसला?
नवी मुंबई: सद्यस्थितीत वेगवेगळे फसवणुकीचे प्रकार समोर येत आहे. त्यातील तरुण वर्गाला धरून असलेला फसवणुकीचा प्रकार म्हणजे ऑनलाईन गेमिंग. सोशल मीडियावर अनेक जाहिराती आणि लिंक येतात आणि त्यावर पैसे कमविण्याबाबत माहिती दिलेली असते. पैसे कमविण्याच्या लोभाने अनेक तरुण या फसवणुकीचे बळी पडतात. अशीच घटना नवी मुंबईतील तरुणासोबत घडली आहे. ऑनलाईन गेम खेळून पैसे कमविण्याच्या नादात तरुणाने 40 लाख रुपये गमावले आहे.
इंस्टाग्रामवरून मिळाली माहिती
नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणासोबत हा प्रकार घडला आहे. त्याला इंस्टाग्रामवरून ऑनलाइन गेमिंगबाबत माहिती मिळाली होती. इंस्टाग्रामवर मिळालेल्या लिंकवर त्याने क्लिक केले असता त्याला या गेमिंग मधून भरपूर पैसे मिळणार असल्याची माहिती मिळाली. पैसे मिळणार या आशेने त्याने त्यावर नोंदणी केली आणि गेम खेळण्यास सुरूवात केली.
advertisement
वेगवेगळे शुल्क भरण्याची मागणी 
ऑनलाईन गेम खेळून त्याचा खूप फायदा होत आहे आणि त्यातून त्याला कोट्यवधी रुपये मिळणार असल्याचे भासवण्यात आले. ही रक्कम जर खात्यात मिळवण्याची असेल तर काही शुल्क भरावे लागेल असेही सांगण्यात आले. त्यांच्याकडून वेगवेगळे शुल्क आकारण्यास सुरवात केली. आपल्याला कोट्यवधी रुपये मिळणार या आशेने तरुण शुल्क भरत राहिला.
advertisement
40 लाखांची फसवणूक
तरुणाने 40 लाख रुपये भरल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने या फसवणूक प्रकरणाची कोपरखैरणे पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांकडून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Online Game: इन्स्टाग्रामवर मिळाली लिंक, पैसे डबल करायला गेला, तरुणाचा 40 लाखांचा ऑनलाईन गेम!
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement