advertisement

Mumbai Delhi Railway: ट्रेलरनं केलं रेल्वेचं ट्राफिक जॅम! फाटक ओलांडताना डिझेल संपलं, पुढं काय घडलं?

Last Updated:

Railway Traffic Jam: मुंबई-दिल्ली रेल्वे मार्ग अत्यंत वर्दळीचा रेल्वेमार्ग आहे. परंतु, रेल्वे फाटक ओलांडताना एका ट्रेलरमधील डिझेल संपलं. त्यामुळे रेल्वेचा खोळंबा झाला.

ट्रेलरनं केलं रेल्वेचं ट्राफिक जॅम! फाटक ओलांडताना डिझेल संपलं, पुढे काय घडलं?
ट्रेलरनं केलं रेल्वेचं ट्राफिक जॅम! फाटक ओलांडताना डिझेल संपलं, पुढे काय घडलं?
जळगाव: मुंबई - दिल्ली रेल्वे मार्गवर दर 10 मिनिटाला रेल्वे गाड्या सुस्साट धावत असतात. अशातच जर एखादे वाहन रेल्वे फाटकावर काही कारणास्तव अडकले तर? हा विचार करून पण धाकधूक होईल ना? अशीच एक घटना चाळीसगाव तालुक्यातील खरजई रेल्वे फाटकावर घडली आहे. त्यामुळे तेथील वाहतूक तब्बल 20 मिनिटे खोळंबली होती. गेटमनने प्रसंगावधान राखून तेथील वाहतूक पूर्ववत केली आणि मोठा अनर्थ टळला.
डिझेल संपल्याने ट्रेलर जागीच थांबला
चाळीसगाव तालुक्यातील खरजई रेल्वे फाटका जवळून सोमवारी सायंकाळच्या वेळी माल वाहतूक ट्रेलर जात होता. रेल्वे फाटक क्रॉस करताना अचानक त्या ट्रेलरमधील डिझेल संपले. त्यामुळे तो जागीच अडकला. त्यानंतर 20 मिनिट तेथील दोन्ही बाजूकडील रेल्वे आणि रस्ते वाहतूक खोळंबली होती. रेल्वे गेटमनने प्रसंगावधान राखून या घटनेची माहिती कंट्रोल रूमला दिली.
advertisement
20 मिनिटानंतर वाहतूक पूर्ववत
गेटमनने माहिती दिल्यानंतर, अप आणि डाऊन मार्गावरील येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या आहे त्याच ठिकाणी थांबवण्यात आल्या. त्यानंतर ट्रेलरमध्ये डिझेल टाकण्यात आले आणि तो तेथून बाजूला करण्यात आला. तब्बल 20 मिनिटानंतर रेल्वे गाड्यांची वाहतून पूर्ववत झाली.
advertisement
वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा
घडलेल्या या सर्व प्रकारामुळे चाळीसगावहून तरवाडे, गुढे, बहाळ या गावांकडे जाणारी वाहतूकही ठप्प झाली होती. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Mumbai Delhi Railway: ट्रेलरनं केलं रेल्वेचं ट्राफिक जॅम! फाटक ओलांडताना डिझेल संपलं, पुढं काय घडलं?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement