गावकऱ्यांचा कांड! पतीचा मित्र अन् 6 मुलांची आई, लावलं जबरदस्तीने लग्न; पण सत्य कळताच उडाली सर्वांची झोप

Last Updated:

दिल्लीमध्ये काम करणाऱ्या रोहित तंती यांच्या अनुपस्थितीत, त्यांच्या पत्नी मलती देवीला मदत करण्यासाठी त्यांनी आपला मित्र राहुल शर्मा याला पाठवले. मात्र...

Forced marriage
Forced marriage
एक सहा मुलांच्या आई पतीच्या मित्राला सतत भेटते. यावरून गावकऱ्यांनी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेतली आणि दोघांचं जबरदस्तीने लग्न लावून दिलं. पण जेव्हा भेटण्यामागचं कारण समोर आलं, तेव्हा सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. जाणून सविस्तर प्रकरण काय आहे ते...
नवरा दिल्लीत मजूर अन् बायको गावात...
संबंधित घटना बिहारच्या जामुईमधून घटना समोर आली आहे, जिथे गावकऱ्यांनी एका महिलेचा तिच्या पतीच्या मित्रासोबत जबरदस्तीने लग्न लावलं. त्यांच्यातील भेटीगाठींना गावकऱ्यांनी 'प्रेमसंबंध' समजल्यामुळे हा प्रकार घडला. मालती देवी, जी सहा मुलांची आई आहे, जामुई जिल्ह्यातील छेदाही गावात एकटी राहत होती, कारण तिचा पती रोहित तांती दिल्लीत मजुरीचे काम करतो.
advertisement
गावकऱ्यांनी लावलं जबरदस्तीने लग्न
जेव्हा जेव्हा मालतीला मदतीची गरज भासे, तेव्हा तांती आपला मित्र राहुल शर्माला, जो दिल्लीतून परतला होता, त्याला बायकोची मदत करण्यासाठी पाठवत असे. याच कारणावरून दोघे भेटत होते. गावकऱ्यांनी त्यांच्या प्रेमसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला आणि दोघांची जबरदस्तीने लग्न लावून दिले.
लग्नाचा व्हिडीओ झाला व्हायरल
राहुल शर्माने मालतीशी लग्न करावं म्हणून काठ्या आणि रॉडने मारहाण केली आणि जबरदस्तीने लग्न लावून देत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. शर्माने स्पष्ट केलंय की, तो आपल्या मित्र तांतीच्या सल्ल्यानुसार मालतीच्या घरी जमिनीसंबंधीच्या कागदपत्रांच्या कामात मदत करण्यासाठी गेला होता, ज्याचा गावकऱ्यांनी चुकीचा अर्थ लावला. शर्माची पत्नी, करीना शर्माने हा जबरदस्तीने लादलेला विवाह स्वीकारण्यास नकार दिला असून तिने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
गावकऱ्यांचा कांड! पतीचा मित्र अन् 6 मुलांची आई, लावलं जबरदस्तीने लग्न; पण सत्य कळताच उडाली सर्वांची झोप
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement