नगर हादरलं! तडीपार गँगने सराफाला घरातून उचललं, डोंगरात नेऊन केला अमानुष छळ
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Ahilyanagar: अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी इथं एका सराफ व्यावसायिक तरुणाचा तडीपार गँगने अमानुष छळ केला आहे. आरोपींनी पीडित तरुणाला घरातून उचलून नेत...
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी अहिल्यानगर: मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमध्ये विविध लोकांना मारहाण झाल्याचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीकडून किंवा टोळीकडून बेदम मारहाण होत असल्याचं दिसत आहे. अलीकडेच बीड जिल्ह्यातील शिरूरमध्ये सतीश उर्फ खोक्या भोसलेनं एका तरुणाला अमानुष मारहाण केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना आता शिरूरला लागून असलेल्या पाथर्डी तालुक्यात देखील अशाच प्रकारची अमानुष घटना घडली आहे.
इथं एका सराफ व्यावसायिक तरुणाला तडीपार गँगने बेदम मारहाण केली आहे. आरोपींनी पीडित तरुणाचं घरातून अपहरण केलं. यानंतर त्याला वनदेवच्या डोंगरात घेऊन जात अमानुष छळ केला. लोखंडी रॉड आणि दगडाने बेदम मारहाण केली. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी तरुणाला मारहाण करतानाचे व्हिडीओ देखील काढले. तसेच गुन्हा दाखल केला तर जीवे मारू, अशी धमकी आरोपींनी दिली. यामुळे पीडित कुटुंबीयांना अद्याप गुन्हा दाखल केला नाही.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, धुलीवंदनाच्या दिवशी तडीपार गँगच्या गुंडानी पाथर्डी येथील रहिवासी असणाऱ्या सराफ व्यावसायिक तरुणाकडे वापरण्यासाठी गाडीची मागणी केली होती. पण या तरुणाने गाडी देण्यास नकार दिला. यावरून तडीपार गुंड आणि तरुणामध्ये किरकोळ बाचाबाची झाली. त्याचदिवशी तरुणाला तडीपार गँगने घरातून उचलून नेलं. त्याला वनदेवाच्या डोंगरात घेऊन जात लोखंडी रॉड, दगड आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
advertisement
या मारहाणीत सराफाचा हात फ्रॅक्चर झाला असून शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया केली आहे. या मारहाणीनंतर आरोपींनी थेट हॉस्पिटलमध्ये जावून मारहाण केलेल्या तरुणाला पोलिसांत गुन्हा दाखल केला तर तुला जीवे मारु, अशी धमकी दिली. यामुळे पीडित कुटुंब घाबरले असून त्यांनी अद्याप फिर्याद दिली नाही. आरोपी हल्लेखोर स्थानिक गुंड असल्याने ते घाबरले आहेत.
view commentsLocation :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Mar 17, 2025 8:05 AM IST










