पायातील जोडव्यांनी सोडवली मर्डर मिस्ट्री; एक्स गर्लफ्रेंडसाठी पत्नीला जाळणाऱ्या तरुणाला अटक
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
20 वर्षीय सूरज लहू तोरडकर याने दोन महिन्यांपूर्वीच आपली प्रेयसी पौर्णिमा पासलकर (वय 18) हिच्यासोबत प्रेमविवाह केला. मात्र, लग्नानंतर काहीच दिवसात एक्स गर्लफ्रेंडसोबत त्याचं पुन्हा बोलणं सुरू झालं.
धाराशिव : धाराशिवच्या भूम येथे एक अतिशय धक्कादायक घटना घडली. यात एका पतीने आपल्या पत्नीसोबत जे काही केलं, ते ऐकूनच कोणाच्याही अंगावर काटा येईल. 20 वर्षीय सूरज लहू तोरडकर याने दोन महिन्यांपूर्वीच आपली प्रेयसी पौर्णिमा पासलकर (वय 18) हिच्यासोबत प्रेमविवाह केला. मात्र, लग्नानंतर काहीच दिवसात एक्स गर्लफ्रेंडसोबत त्याचं पुन्हा बोलणं सुरू झालं. यानंतर त्याने पत्नीला आपल्या मार्गातून दूर करण्यासाठी भयानक कट रचला
या तरुणाने पत्नीची हत्या केली. हत्येनंतर त्याने अल्पवयीन प्रेयसीसोबत पळून जाण्याचं ठरवलं. मात्र, प्रेयसीच्या घरच्यांनी आपल्याला शोधण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी त्याने आपल्या पत्नीचा मृतदेह हा त्या अल्पवयीन प्रेयसीचा असल्याचा दाखवण्यासाठी आणखी मोठं कांड केलं. मृतदेह प्रेयसीचा असल्याचं भासवण्यासाठी त्याने पत्नीचा मृतदेह जाळला आणि त्याजवळ प्रेयसीच्या नावाने आत्महत्या करत असल्याची एक चिठ्ठी सोडली. यानंतर तो आपल्या प्रेयसीसोबत पनवेलच्या चिपळे गावात राहण्यासाठी गेला.
advertisement
यानंतर जळालेला मृतदेह अल्पवयीन मुलीच्या घरच्यांच्या ताब्यात दिला जात होता. त्यावेळी पायाच्या बोटांमध्ये जोडवी दिसल्याने पोलिसांना संशय आला. मग पोलिसांनी पौर्णिमाच्या कुटुंबीयांनाही बोलावलं. यानंतर पौर्णिमाच्या पायाच्या अंगठ्याजवळ असलेल्या जन्मखुणेमुळे तिची ओळख पटली आणि आरोपी सूरजचा डाव समोर आला.
पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. यावेळी पनवेल डेपो परिसरात हा आरोपी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पनवेल डेपो परिसरातून आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं. त्याची अल्पवयीन प्रेयसीदेखील त्याच्यासोबतच होती. पोलिसांनी दोघांकडे या प्रकरणी चौकशी केली. यावेळी सूरजने भूम येथील गावी पत्नी पौर्णिमा हिची हत्या करून मृतदेह जाळला असल्याची माहिती पोलिसांना दिली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 16, 2024 1:19 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
पायातील जोडव्यांनी सोडवली मर्डर मिस्ट्री; एक्स गर्लफ्रेंडसाठी पत्नीला जाळणाऱ्या तरुणाला अटक