गडचिरोलीत 4 वर्षीय मुलीला घरी बोलावून 50 वर्षीय शेजाऱ्यानं केलं घृणास्पद कृत्य; चिमुकली रुग्णालयात दाखल
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
मुलीला बोलावून आरोपीने तिच्यावर अत्याचार केले. पीडित बालिकेला गडचिरोली येथील महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं
गडचिरोली, (महेश तिवारी, प्रतिनिधी) : गडचिरोलीतून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका 4 वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घृणास्पद मन हेलावून टाककणारी घटना घडली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम जारावंडी येथून हे प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून संतोष नागोबा कोंढेकर असं आरोपीचं नाव आहे.
आरोपी संतोष कोंढेकर हा 50 वर्षाता असून हा नराधम पीडित बालिकेचा शेजारीच आहे. आरोपी हा जारावंडी येथील प्राथमिक आरोग्य पथक येथे शिपाई या पदावर कार्यरत आहे. दरम्यान पीडीत बालिका ही आरोग्य केंद्राच्या समोरच राहायची. आरोपीने सायंकाळी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान मुलीला आपल्या वसाहत येथे बोलावून घेतलं.
मुलीला बोलावून आरोपीने तिच्यावर अत्याचार केले. पीडित बालिकेला गडचिरोली येथील महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. परंतु प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने तिला नागपूरला हलवण्यात आलं आहे. सध्या पीडित चिमुकलीवर उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणातील आरोपी 50 वर्षांचा असून त्याला दोन मुलंही आहेत. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
advertisement
सेक्सला नकार दिल्याने मित्राची हत्या -
राजस्थानमधील बारन जिल्ह्यातही नुकतीच एक अत्यंत धक्कादायक घटना घडली होती. इथं एका तरुणाची विचित्र कारणावरून हत्या करण्यात आली. मित्रांनी दारुच्या नशेत या तरुणाचा खून केल्याचं स्पष्ट झालं. एका तरुणाची त्याच्या मित्रांनी निर्घृण हत्या केली. तरुणाने ओरल सेक्सला नकार दिल्याने मित्रांनी त्याची हत्या केली. हत्या केल्यावर त्याचा मृतदेह लपवण्याच्या नादात तो एका कोरड्या तलावात फेकून दिला होता. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू करताच दोन्ही आरोपींची नावं स्पष्ट झाली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 11, 2024 11:05 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
गडचिरोलीत 4 वर्षीय मुलीला घरी बोलावून 50 वर्षीय शेजाऱ्यानं केलं घृणास्पद कृत्य; चिमुकली रुग्णालयात दाखल










