Priyanshu Kshatriya : मित्राने घरी बोलवलं, म्हणाला दारू प्यायला बस! बाबू छत्रीसोबत घडलं भयंकर, नागराजच्या हिरोचा खून कसा झाला?

Last Updated:

Jhund actor Priyanshu Kshatriya Murder : प्रियांशु आणि ध्रुव शाहू हे मित्र होते. शाहूने प्रियांशुला त्याच्या घरी बोलावले होते. मंगळवारी रात्री उशिरा त्यांनी एकत्र दारू प्यायली.

 Jhund actor Priyanshu Kshatriya Murder
Jhund actor Priyanshu Kshatriya Murder
Priyanshu Kshatriya Murder Case : दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. अशातच या सिनेमातील एक पात्र सर्वांच्याच लक्षात असेल, ते म्हणजे बाबू छत्री याचं पात्र. याच बाबू छत्रीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्री याची बुधवारी रात्री हत्या करण्यात आली. गुन्हेगारी विश्वात वावरणं बाबूला महागात पडलं. जवळच्या मित्रानेच बाबू छत्री याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

गप्पा रंगल्या अन् वाद झाला

समोर आलेल्या वृत्तानुसार, प्रियांशु आणि ध्रुव शाहू हे मित्र होते. शाहूने प्रियांशुला त्याच्या घरी बोलावले होते. मंगळवारी रात्री उशिरा त्यांनी एकत्र दारू प्यायली. गप्पा रंगल्या अन् वाद झाला. त्यानंतर दोघांनी दारूच्या नशेत एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने त्याला चाकूने भोसकून ठार मारलं. ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी घडली.
advertisement

गळ्यावरच वार अन् प्रियांशू कोसळला

आरोपीला प्रियांशुच्या शरीरावर चाकूने वार केले. त्यानंतरही त्याला तो जिवंत असल्याचा संशय आला, त्याने त्याच्यावर दगड फेकला आणि तो पुन्हा झोपी गेला. गळ्यावरच वार झाल्याने प्रियांशू कोसळला होता. त्या सकाळी पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हा त्याला खात्री झाली की, प्रियांशुचा मृत्यू झालाय.

राबवत शाहूला अटक

advertisement
दरम्यान, आरोपीने त्याला वायरने करकचून बांधले आणि फेकून दिलं. वस्तीतील लोकांना पहाटे तो वायरने गुंडाळलेल्या अवस्थेत पडलेला दिसला. तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा प्रियांशू शाहूसोबत बाहेर गेला होता अशी माहिती कळाली. पोलिसांनी शोधमोहीम राबवत शाहूला अटक केली आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Priyanshu Kshatriya : मित्राने घरी बोलवलं, म्हणाला दारू प्यायला बस! बाबू छत्रीसोबत घडलं भयंकर, नागराजच्या हिरोचा खून कसा झाला?
Next Article
advertisement
ZP Election Maharashtra: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा, मतदान कधी? मोठी अपडेट...
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा, मतदान कधी? मोठी
  • नगर परिषद, नगर पालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापालिका निवडणुकीची रणधुमाळी

  • दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचाही धुरळा लवकरच उडणार असल्याचे वृत्त समोर

  • महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होणार अ

View All
advertisement