'सोनमचा बॉयफ्रेंड तर छपरी निघाला', राजचा फोटो आला समोर, लोकांकडून मुस्कानच्या प्रियकरासोबत तुलना

Last Updated:

Indore Couple Missing Case: सोनमने विवाहपूर्व प्रेम प्रकरणातून ही हत्या केली असल्याचे समोर आले आहे. सोनम आता पोलिसांच्या ताब्यात असून तिच्या प्रियकराचा फोटो समोर आला आहे.

'सोनमचा बॉयफ्रेंड तर छपरी निघाला', राजचा फोटो आला समोर, लोकांकडून मुस्कानच्या प्रियकरासोबत तुलना
'सोनमचा बॉयफ्रेंड तर छपरी निघाला', राजचा फोटो आला समोर, लोकांकडून मुस्कानच्या प्रियकरासोबत तुलना
Sonam Raghuwanshi Arrested: मेघालयात हनिमूनवर गेलेले इंदूरमधील राजा रघुवंशी यांच्या हत्या प्रकरणात आता अनेक धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत. सोनमने विवाहपूर्व प्रेम प्रकरणातून ही हत्या केली असल्याचे समोर आले आहे. सोनम आता पोलिसांच्या ताब्यात असून तिच्या प्रियकराचा फोटो समोर आला आहे. प्रियकराचे नाव राज कुशवाह असे आहे. सोनम आणि इतर तीन आरोपींसह राजला ताब्यात घेण्यात आले आहे.
शिलाँगच्या मावलाखियात भागातील एका टुरिस्ट गाईडने पोलिसांना सांगितले होते की या जोडप्यासोबत शेवटचे तीन अज्ञात पुरुष दिसले होते. काही दिवसांनी पोलिसांना राजाचा मृतदेह सापडला, त्यानंतर या प्रकरणाने नवे वळण घेतले.

राजनेच काढला राजाचा काटा...

तपासादरम्यान असे आढळून आले की सोनमचे तिचा प्रियकर राज कुशवाहासोबत प्रेमसंबंध होते आणि ती त्याच्यासोबत तिच्या पतीची हत्या करण्याचा कट रचत होती.
advertisement
पोलिसांनी कॉल डिटेल रेकॉर्डच्या (CDR) माध्यमातून राज कुशवाह याचा ठावठिकाणा शोधून काढला आणि मुसक्या आवळल्या. आरोपी राज कुशवाहा हा सोनमच्या सातत्याने संपर्कात होता. तोच या प्रकरणाचा मास्टरमाइंड निघाला. पोलिसांनी विक्की ठाकूर आणि आनंद यांनादेखील अटक केली आहे. आनंदला शिलाँग पोलिसांनी मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातून अटक केली आहे.

लोकांकडून सोनमच्या बॉयफ्रेंडची मुस्कानच्या प्रियकरासोबत तुलना...

advertisement
आरोपी राजच्या अटकेनंतर त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोनमच्या बॉयफ्रेंडचा फोटो व्हायरल होताच लोकांनी त्याची तुलना मेरठच्या मुस्कान हत्याकांडातील आरोपीशी करायला सुरुवात केली. अनेक युजर्सनी सोनमच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि तिच्या बॉयफ्रेंडला 'छपरी' असेही म्हटले. एका युजरने लिहिले, 'अरे सोनमचा बॉयफ्रेंड 'छपरी' निघाला.' तर दुसऱ्या युजरने लिहिले, 'मुस्कानची धाकटी बहीण सोनम.'
advertisement

मुस्काननेही प्रियकरासोबत केली पतीची हत्या...

सौरभ हत्याकांडाची देशभरात चांगलीच चर्चा झाली. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये पत्नी मुस्कानने तिचा प्रियकर साहिलसोबत मिळून तिचा पती सौरभची हत्या केली. अतिशय क्रूरपणे सौरभला संपवण्यात आले. हत्या केल्यानंतर सौरभच्या मृतदेहाचे तुकडे करून ड्रममध्ये टाकला आणि त्याला सिमेंट थापण्यात आले. एवढेच नाही तर हत्येनंतर हे क्रूर लोक हिमाचलला फिरायला गेले. त्यांनी 11 दिवस तिथे सुट्टी एन्जॉय केली. तिथून परत आल्यानंतर हे भयकंर कांड उघड झाले. पोलिसांनी दोघांनाही अटक करून तुरुंगात पाठवले. आता दोघेही तुरुंगात आहेत आणि सुटकेचे स्वप्न पाहत आहेत. त्यावेळी देखील लोकांनी मुस्कानच्या प्रियकराचीही खिल्ली उडवली.
advertisement

इतर संबंधित बातमी:

मराठी बातम्या/क्राइम/
'सोनमचा बॉयफ्रेंड तर छपरी निघाला', राजचा फोटो आला समोर, लोकांकडून मुस्कानच्या प्रियकरासोबत तुलना
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement