Sangli Crime News: आईने आणि लेकीने केला होता फुल प्रुफ प्लान, मात्र डेड बॉडी सत्य सांगून गेली

Last Updated:

मयुरने दोघींना बेदम मारहाण केली, त्यादिवशीच दोघींनी त्याचा काटा काढण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी हत्येचा कट रचला.

News18
News18
सांगली : आईने मुलीच्या मदतीने पोटच्या मुलाची हत्या केल्याने तासगाव हादरले आहे. मुलाला गुंगीचे औषध देऊन त्याच्या डोक्यात दगड घालून कापराने पेटवून दिले, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. आईने आणि लेकीने आगीत मृत्यू झाल्याचा कांगावा केला. मात्र तासगाव पोलिसांनी चक्र वेगाने फिरवली आणि काही तासातच आईला आणि मुलीचे कारस्थान पुढे आणत आईला आणि मुलीला बेड्या ठोकल्या आहे.
मयुर माळी असे मृत तरुणाचे नाव आहे. आई संगीता रामचंद्र माळी (वय वर्षे 50) आणि बहीण काजल रामचंद्र माळी (वय वर्षे 19) अशी आरोपींची नावे आहे. मयुरला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन आल्यानंतर त्याची आई आणि बहिणीसोबत सतत भांडण होत असे, वादानंतर तो शिवीगाळ करच दोघींना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होता. सतत होणाऱ्या या भांडणाला आई संगीता आणि बहीण काजल कंटाळली होती. एक दिवशी मयुरने दोघींना बेदम मारहाण केली, त्यादिवशीच दोघींनी त्याचा काटा काढण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी हत्येचा कट रचला.
advertisement

गप्पा मारल्या अन् घरी गेला...

समोर आलेल्या माहितीनुसार, तासगावच्या कासार गल्लीत राहणारा मयूर हा सामाजिक कार्यकर्ता होता. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे तो मित्रांसोबत गप्पा मारत होता, त्यानंतर तो घरी गेला. शनिवारी आग लागल्याची घटना घरातील आतील बाजूस घडली. या आगीत होरपळून मयुरचा मृत्यू झाला. त्यानंतर मयुरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. डोक्यात जबर मार लागल्याने मयुरचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात समोर आले, त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला.
advertisement

पोलिसांनी कशी केली पोलखोल

मयुरचे शरीर भाजलेले होते, पण त्याच्या डोक्यावर जखम होती. तसेच त्याचा डावा कान तुटलेला दिसला आणि डोळ्याच्यावरील बाजूला देखील काही जखमा होता.नाकातून आणि तोंडातून फेस पण आला असल्याने पोलिसांची शंका बळावली, त्यानंतर पोलिसांनी आईची आणि तिच्या लेकीची कसून चौकशी केली. या चौकशीत दोघींनी हत्या केल्याची कबुली दिली. या हल्ल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
Sangli Crime News: आईने आणि लेकीने केला होता फुल प्रुफ प्लान, मात्र डेड बॉडी सत्य सांगून गेली
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement