Asia Cup : पाकिस्तानच्या धमकीची हवा निघाली, खेळाडू मैदानाकडे निघाले, UAE विरुद्धच्या सामन्यात नवा ट्विस्ट
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपच्या पाकिस्तान आणि युएई यांच्यातल्या सामन्याआधी मोठा ड्रामा पाहायला मिळाला आहे. पाकिस्तानचे खेळाडू अखेर हॉटेलमधून निघाले आहेत.
दुबई : आशिया कपच्या पाकिस्तान आणि युएई यांच्यातल्या सामन्याआधी मोठा ड्रामा पाहायला मिळाला आहे. पाकिस्तानचे खेळाडू अखेर हॉटेलमधून निघाले आहेत, तसंच युएईविरुद्धची मॅच थोडी उशिरा सुरू होणार असल्याची माहितीही समोर आली आहे. दुबईतल्या स्थानिक वेळेनुसार हा सामना 7.30 वाजता सुरू होईल, तर टॉस 7 वाजता होईल.
पाकिस्तान आणि युएई यांच्या सामन्यात ऍन्डी पायक्रॉफ्ट हेच मॅच रेफरी असतील, असं आयसीसीने स्पष्ट केलं होतं. भारताविरुद्धच्या हस्तांदोलन वादानंतर पीसीबीने पायक्रॉफ्ट यांना मॅच रेफरी पदावरून बाजूला करावं अशी मागणी केली होती, पण पीसीबीची ही मागणी आयसीसीने फेटाळून लावली. तसंच पायक्रॉफ्ट हेच पाकिस्तान-युएई यांच्यातल्या सामन्यात मॅच रेफरी असतील, असं स्पष्ट केलं. यानंतर पीसीबीने पायक्रॉफ्ट मॅच रेफरी असतील, तर युएईविरुद्ध खेळणार नसल्याचा इशारा दिला होता.
advertisement
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना पुढील आदेश येईपर्यंत हॉटेलमध्येच राहण्याचे आदेश दिले होते. यानंतर पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांनी लाहोरच्या गडाफी स्टेडियममध्ये एक बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी खेळाडूंना स्टेडियममध्ये जायला सांगितलं आहे.
काय आहे वाद?
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मॅच रेफरी ऍन्डी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी आयसीसीकडे केली होती. ही मागणी मान्य झाली नाही तर युएईविरुद्ध खेळणार नसल्याची धमकी पाकिस्तानने दिली होती. आयसीसीने पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची पीसीबीची मागणी मान्य केली नाही, त्यामुळे पाकिस्तानने युएईविरुद्ध खेळायला नकार दिला आहे. पाकिस्तान-युएई सामन्यामध्ये पायक्रॉफ्ट हेच मॅच रेफ्री होते.
advertisement
रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा 7 विकेटने विजय झाला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नाही. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा टॉससाठी आले, तेव्हा मॅच रेफरी ऍन्डी पायक्रॉफ्ट यांनी हस्तांदोलन होणार नसल्याचं सांगितलं. सामना संपल्यानंतरही भारतीय टीमने हस्तांदोलन केलं नाही, त्यामुळे अपमान झाल्याची तक्रार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 7:40 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup : पाकिस्तानच्या धमकीची हवा निघाली, खेळाडू मैदानाकडे निघाले, UAE विरुद्धच्या सामन्यात नवा ट्विस्ट