पाकिस्तानी टीम अजून हॉटेलमध्येच, UAE चे खेळाडू मैदानात, टॉसआधी दुबईमध्ये मोठा ड्रामा

Last Updated:

आशिया कपमध्ये पाकिस्तान आणि युएई यांच्यातल्या सामन्याआधी मोठा ड्रामा पाहायला मिळत आहे. पाकिस्तानची टीम अजून हॉटेलमधून स्टेडियममध्ये येण्यासाठी निघालेली नाही.

पाकिस्तानी टीम अजून हॉटेलमध्येच, UAE चे खेळाडू मैदानात, टॉसआधी दुबईमध्ये मोठा ड्रामा
पाकिस्तानी टीम अजून हॉटेलमध्येच, UAE चे खेळाडू मैदानात, टॉसआधी दुबईमध्ये मोठा ड्रामा
दुबई : आशिया कपमध्ये पाकिस्तान आणि युएई यांच्यातल्या सामन्याआधी मोठा ड्रामा पाहायला मिळत आहे. पाकिस्तानची टीम अजून हॉटेलमधून स्टेडियममध्ये येण्यासाठी निघालेली नाही, त्यामुळे या सामन्यावर संकट ओढावलं आहे. पाकिस्तानची टीम युएईविरुद्धच्या या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊ शकते, असं वृत्त पाकिस्तानमधील जिओ न्यूजने दिलं आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसीन नक्वी हे पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीज राजा आणि नजीम सेठी यांच्यासोबत लाहोरच्या गडाफी स्टेडियममध्ये या मुद्द्यावर बैठक घेत आहेत. तसंच ते दुबईमध्ये टीमसोबतही संपर्कात आहेत. पाकिस्तानी टीम अजून हॉटेलमध्येच असल्यामुळे हा सामना सुरू झाला, तरीही तो उशीरा सुरू होईल, हे आता स्पष्ट झालं आहे.
advertisement

युएईची टीम मैदानात

दुसरीकडे युएईची टीम मात्र दुबईच्या स्टेडियममध्ये पोहोचली आहे आणि त्यांनी सरावही सुरू केला आहे. पाकिस्तानच्या टीमने हा सामना खेळायला नकार दिला, तर मॅचचे 2 पॉईंट्स युएईला दिले जातील, त्यामुळे भारतासोबत युएई सुपर-4 मध्ये प्रवेश करेल. तसंच पाकिस्तानचं आशिया कपमधील आव्हान ग्रुप स्टेजमध्येच संपुष्टात येईल.

काय आहे वाद?

advertisement
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मॅच रेफरी ऍन्डी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी आयसीसीकडे केली होती. ही मागणी मान्य झाली नाही तर युएईविरुद्ध खेळणार नसल्याची धमकी पाकिस्तानने दिली होती. आयसीसीने पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची पीसीबीची मागणी मान्य केली नाही, त्यामुळे पाकिस्तानने युएईविरुद्ध खेळायला नकार दिला आहे. पाकिस्तान-युएई सामन्यामध्ये पायक्रॉफ्ट हेच मॅच रेफ्री होते.
रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा 7 विकेटने विजय झाला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नाही. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा टॉससाठी आले, तेव्हा मॅच रेफरी ऍन्डी पायक्रॉफ्ट यांनी हस्तांदोलन होणार नसल्याचं सांगितलं. सामना संपल्यानंतरही भारतीय टीमने हस्तांदोलन केलं नाही, त्यामुळे अपमान झाल्याची तक्रार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केली आहे.
advertisement
'आयसीसीने नियुक्त केलेल्या मॅच रेफरींनी खेळ भावना आणि कायद्यांचे स्पष्टपणे उल्लंघन केलं आहे. मॅच रेफरींचं हे वर्तन चिंताजनक आहे. मॅच रेफरी त्यांची जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले. मॅच रेफरीचं काम दोन्ही टीममधला आदर कसा वाढेल? हे पाहणं आहे, पण त्यांनी एका टीमची बाजू घेतली', असं पत्र पीसीबीने आयसीसीला लिहिलं. आयसीसीने मात्र पायक्रॉफ्ट यांना बाजूला करण्याची पीसीबीची मागणी फेटाळून लावली.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
पाकिस्तानी टीम अजून हॉटेलमध्येच, UAE चे खेळाडू मैदानात, टॉसआधी दुबईमध्ये मोठा ड्रामा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement