Chandrapur News : चंद्रपूरमध्ये खळबळ, नागरिकांच्या डोळ्यांसह घशांना जळजळ,उलटी डोकेदुखीचाही त्रास,नेमकं काय चाललंय?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
महानगरपालिकेच्या एका प्लांटमधून क्लोरीन गॅसची गळती झाल्यामुळे नागरीकांच्या डोळ्यांसह घशांना जळजळ आणि डोकेदुखी आणि उलट्यांचाही त्रास होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
Chandrapur News : हैदर शेख, चंद्रपूर : चंद्रपुर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत महानगरपालिकेच्या एका प्लांटमधून क्लोरीन गॅसची गळती झाल्यामुळे नागरीकांच्या डोळ्यांसह घशांना जळजळ आणि डोकेदुखी आणि उलट्यांचाही त्रास होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या आरोपानंतर 25 ते 30 कुटुंबियांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे.
चंद्रपूर शहरातील रहमतनगर भागात महानगरपालिकेच्या सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट आहे. या प्लांट मधून गेल्या काही दिवसांपासून क्लोरीन गॅस गळती होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. कारण या गॅसमुळे महापालिकेच्या प्लांटनजीक राहणाऱ्या नागरीकांना मोठ्या प्रमाणात डोळे आणि घशात जळजळ होत होती. तसेच डोकेदुखी आणि उलटीचा त्रास होत होता.
या घटनेनंतर आज संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात क्लोरीन गॅसची गळती सूरू झाली होती. त्यामुळे परिसरात एकच घबराट पसरली होती. त्यानंतर स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.तसेच या घटनेची माहिती कळताच जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्याचसोबत क्लोरीन गॅस गळती प्लांट मधून थांबवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सूरू आहेत.
advertisement
4 कामगारांचा मृत्यू
पालघरमधील बोईसर तारापूर एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीच्या प्लांटमध्ये वायू गळती झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेमध्ये 4 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहे. जखमी कामगारांना सध्या बोईसरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. केमिकल कंपनीमध्ये वायू गळतीचं कारणही समोर आलं आहे.
बोईसर तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर एफ 13 वर असलेल्या मेडली फार्मासिटिकल या कंपनीत दुपारी तीन वाजताच्या सुमारास वायू गळती झाल्याची घटना समोर आली आहे. नायट्रोजन रिएक्शन टँकमध्ये वायू गळती झाली असून यात आतापर्यंत चार कामगारांचा मृत्यू झाला झाला तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमी कामगारांवर सध्या बोईसर मधील शिंदे या खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
advertisement
एल बेंडोझोल नामक औषधाचं उत्पादन घेणाऱ्या या कारखान्यात तीन वाजताच्या सुमारास वायू गळती झाली असून या वायुगळतीची बाधा आठ कामगारांना झाल्याचं सांगितलं जातंय. मात्र यानंतर चार कामगारांचा रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू झाला असून चार कामगारांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
Location :
Chandrapur,Maharashtra
First Published :
September 17, 2025 7:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chandrapur News : चंद्रपूरमध्ये खळबळ, नागरिकांच्या डोळ्यांसह घशांना जळजळ,उलटी डोकेदुखीचाही त्रास,नेमकं काय चाललंय?