धक्कादायक! हाॅटेलमध्ये घेऊन जायची विद्यार्थ्याला; नंतर ही शिक्षिका बंद करायची खोलीचं दार, पुढे...

Last Updated:

गुरुग्राममधील एका शाळेतील विवाहित शिक्षिकेने 12 वीच्या विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केले. ही शिक्षिका विद्यार्थ्याला क्लासच्या कामाच्या बहाण्याने घरी बोलावून किंवा...

Crime News
Crime News
एका विवाहित महिला शिक्षिकेने 12 वीच्या एका विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. ही आरोपी शिक्षिका गुरुग्राममधील एका शाळेत शिकवते आणि ती पीडित विद्यार्थ्याची वर्गशिक्षिका होती. ही शिक्षिका वेगवेगळ्या कारणांनी त्या विद्यार्थ्याला आपल्या घरी बोलवत असे आणि तिथे त्याच्यावर लैंगिक अत्याचार करत असे. इतकंच नाही, तर या शिक्षिकेने विद्यार्थ्याला अनेक वेळा हॉटेलमध्येही नेलं होतं. पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी याचे अनेक व्हिडिओ पुरावा म्हणून पोलिसांना दिले आहेत.
शिक्षिका झालीय फरार, पोलीस तिच्या मागावर
ही धक्कादाय बातमी हरियाणामधील रेवाडीतून समोर आली आहे. या घटनेची तक्रार दाखल होताच, आरोपी शिक्षिकेने अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज केला. पण कोर्टाने पुरावे पाहून तिचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर ती शिक्षिका फरार झाली आहे. आता पोलीस तिचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी धाडी टाकत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थी मूळचा रेवाडी जिल्ह्यातील धारुहेरा येथील आहे. तो गुरुग्राममधील एका नामांकित शाळेत शिकत होता. तिथे त्याची वर्गशिक्षिका त्याला अभ्यासाचं काम असल्याचं सांगून घरी बोलवायला लागली. हळूहळू शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ही शिक्षिका अंदाजे 35 वर्षांची असून ती विवाहित आहे. घरी पकडले जाण्याची भीती वाटू लागल्यावर तिने विद्यार्थ्याला हॉटेलमध्ये नेण्यास सुरुवात केली.
advertisement
मार्कांची आमिष विद्यार्थ्याला नेलं हाॅटेलमध्ये...
जून 2024 मध्ये, या शिक्षिकेने विद्यार्थ्याला धारुहेरातील सेक्टर-6 मधील एका हॉटेलमध्ये नेलं. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही शिक्षिकेने विद्यार्थ्याला हॉटेलमध्ये नेऊन त्याच्यावर अत्याचार केले. त्यानंतर या महिला शिक्षिकेने धारुहेरा येथील एका सोसायटीमध्ये नवीन घर घेतलं. तिथेही ती चांगल्या मार्कांची लालूच दाखवून विद्यार्थ्याला बोलवायला लागली आणि नवीन घरातही तिने त्याच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले.
advertisement
विद्यार्थ्याने बनवले होते व्हिडीओ, पुरावा सादर
जेव्हा पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांना हे सर्व कळलं, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी मार्च 2025 मध्ये पोलिसांत तक्रार दाखल केली आणि अनेक व्हिडिओ पोलिसांना पुरावा म्हणून दिले. हे व्हिडिओ विद्यार्थ्यानेच बनवले होते. सुरुवातीच्या तपासणीत असं समोर आलं आहे की, ही महिला शिक्षिका मूळची चरखी दादरी येथील आहे. ती विद्यार्थ्यांना हॉटेलमध्ये नेताना त्यांना आपले नातेवाईक असल्याचं सांगत असे. आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे, शिक्षिका हॉटेलचे पैसे रोखीत (कॅशमध्ये) देत असे. पोलिसांनी संबंधित हॉटेल्सचे रेकॉर्ड तपासले, तेव्हा त्या दोघांची तिथे उपस्थिती असल्याची खात्री झाली.
advertisement
पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर, अटक टाळण्यासाठी या महिला शिक्षिकेने फास्ट ट्रॅक कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, पण कोर्टाने तो फेटाळून लावला. रेवाडीचे एसपी हेमंत मीना यांनी सांगितलं आहे की, आरोपी शिक्षिका फरार आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. शिक्षिकेला ताब्यात घेऊन तिची चौकशी करण्याची परवानगी कोर्टातून घेण्यात आली आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
धक्कादायक! हाॅटेलमध्ये घेऊन जायची विद्यार्थ्याला; नंतर ही शिक्षिका बंद करायची खोलीचं दार, पुढे...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement