Mira Bhaindar Crime: भांगेच्या गोळ्या दिल्या, दारू पाजली अन्... कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, मीरा- भाईंदर हादरलं!
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
एका मित्राने आपल्या एका मैत्रिणीवर भर रस्त्यावर चारचाकी वाहनात अत्याचार केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मीरा- भाईंदर हादरलं आहे.
मीरा- भाईंदरमध्ये एक संतापजनक प्रकार घडला आहे. एका मित्राने आपल्या एका मैत्रिणीवर भर रस्त्यावर चारचाकी वाहनात अत्याचार केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मीरा- भाईंदर हादरलं आहे. आपल्या एका मित्राच्या मदतीने त्या तरूणाने आपल्या मैत्रिणीवर सामुहिक अत्याचार केले आहेत. 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 21 वर्षीय आणि 24 वर्षीय तरूणांनी तिला भांगेच्या गोळ्या देऊन आणि दारू पाजून तिला बेशुद्ध करून तिच्यावर अत्याचार केले आहेत.
भररस्त्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना 5 जानेवारी रोजी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासोबत मीरा रोडमध्ये राहत होती. त्या अल्पवयीन मुलीवर 5 जानेवारी रोजी तिच्या मित्राने बळजबरीने अत्याचार केला. 21 वर्षीय सलमानने त्या मुलीला कारमध्ये बळजबरीने बसवून कमी वर्दळीच्या एल. आर. तिवारी कॉलेज रोडवर कार आणली. त्यावेळी सलमानसोबत त्याचा एक 24 वर्षीय मित्र सुद्धा होता. त्या दोघांनीही कारमध्येच त्या मुलीवर अमानुष पद्धतीने अत्याचार केला. त्या दोघांनीही मुलीला भांगेच्या गोळ्या देऊन आणि दारू पाजून तिला बेशुद्ध करून तिच्यावर अत्याचार केले.
advertisement
सलमानने आणि त्याच्या मित्राने सर्वात पहिले तिला जबरदस्तीने भांगेच्या गोळ्या खायला घातल्या. पण, तरीही ती शुद्धीतच होती. मग त्यानंतर त्या दोघांनीही तिला दारू पाजून पूर्णपणे बेशुद्ध केले. शुद्ध हरपल्यानंतर, दोन्ही आरोपींनी आळीपाळीने तिच्यावर कारमध्ये अत्याचार केले. या संतापजनक प्रकाराने संपूर्ण मीरा- भाईंदर हादरले. घडलेल्या संपूर्ण प्रकरणानंतर त्या अल्पवयीन मुलीने दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या कुटुंबाला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर लगेचच तिच्या कुटुंबीयांनी लगेचच पोलिसांत धाव घेतली. मंगळवारी पीडितेच्या कुटुंबीयांकडून मीरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
advertisement
दरम्यान, मीरा रोड पोलिसांनी त्या दोन्हीही तरूणांविरोधात लगेचच बाललैंगिक अत्याचारासह गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवून घेतला. त्यानंतर पोलिसांनी दोन्हीही आरोपींचा शोध घेत त्यांना बुधवारी दुपारी अटक केली.
Location :
Mira-Bhayandar,Thane,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 10:00 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Mira Bhaindar Crime: भांगेच्या गोळ्या दिल्या, दारू पाजली अन्... कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, मीरा- भाईंदर हादरलं!








