Egg vs Chicken : अंड की चिकन, प्रोटीन कशात जास्त? वेट लॉस करणाऱ्यांसाठी कुठला पर्याय जास्त फायदेशीर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Egg vs Chicken :
advertisement
advertisement
advertisement
अंड्यांचे 'पॉवरपॅक' न्यूट्रिशनएका मोठ्या आकाराच्या अंड्यामध्ये साधारणपणे 6 ते 7 ग्रॅम प्रोटीन असते. अंड्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते 'कम्प्लीट प्रोटीन' मानले जाते, कारण त्यात शरीरासाठी आवश्यक असलेले सर्व 9 अमिनो ॲसिड्स आढळतात. अंड्याच्या पांढरा भागात 3.6 ग्रॅम प्रोटीन असते आणि फॅट अजिबात नसतो. तर अंड्यातील पिवळा बलकामध्ये 2.7 ग्रॅम प्रोटीनसोबतच विटामिन A, B12, कोलीन आणि हेल्दी फॅट्स असतात.
advertisement
advertisement
चिकनचिकनबद्दल बोलायचं झालं तर चिकन ब्रेस्ट हे प्रोटीनचा खजिना आहे. जर आपण प्रमाणाचा विचार केला, तर 100 ग्रॅम चिकन ब्रेस्टमध्ये तब्बल 27 ते 32 ग्रॅम प्रोटीन असते. चिकन ब्रेस्टला 'लीन मीट' म्हणतात, कारण यात फॅट अत्यंत कमी आणि प्रोटीन जास्त असते. यात नियासिन, सेलेनियम, फॉस्फरस आणि विटामिन B6, B12 भरपूर प्रमाणात असतात, जे आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करतात.
advertisement
मग आता प्रश्न असा की वजन कमी करण्यासाठी काय खावं?1. जर तुमचे ध्येय 'मसल गेन' असेल: ॲथलीट्स आणि बॉडी बिल्डर्ससाठी चिकन ब्रेस्ट उत्तम आहे, कारण कमी कॅलरीजमध्ये तुम्हाला जास्त प्रोटीन मिळते.2. जर बजेट आणि सोय महत्त्वाची असेल: अंडी हा स्वस्त आणि मस्त पर्याय आहे. ते पचायला हलके असतात आणि शरीराला त्वरित पोषण देतात.3. विटामिन D साठी: अंड्यामध्ये विटामिन डी असते, जे हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहे, जे चिकनमध्ये कमी असते.तज्ज्ञांचा सल्ला:हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून राहण्यापेक्षा अंडी आणि चिकन या दोन्हीचा समतोल आहारात ठेवावा.
advertisement
सकाळी नाश्त्याला अंडी आणि दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात चिकनचा समावेश केल्यास शरीराला दर्जेदार प्रोटीन आणि आवश्यक सूक्ष्म पोषक घटक दोन्ही मिळतात. वजन कमी करताना केवळ प्रोटीन महत्त्वाचे नाही, तर ते तुम्ही कशा प्रकारे शिजवता हेही महत्त्वाचे आहे. भरपूर तेल वापरून बनवलेले चिकन रस्सा खाण्यापेक्षा वाफवलेले (Steamed) किंवा ग्रिल्ड चिकन आणि उकडलेली अंडी खाणे वेटलॉससाठी जास्त फायदेशीर ठरेल.









