'लोक पैसे मागायला यायचे अन् पप्पा...', अख्ख्या देशाला हसवणाऱ्या करण सोनावणेने सांगितला आयुष्यातला 'तो' कठीण काळ
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Karan Sonawane Bigg Boss Marathi 6: सोशल मीडियावर ज्याच्या एका रीलवर लाखो लोक खळखळून हसतात, तोच करण सोनावणे सध्या बिग बॉस मराठी ६ च्या घरात आपल्या आयुष्यातील सर्वात भावनिक गोष्टी उलगडतोय.
advertisement
advertisement
advertisement
करणने त्याच्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला, जो त्याच्या मनावर आजही कोरलेला आहे. तो म्हणाला, "माझ्या डोक्यात तो काळ अजूनही ताजा आहे. घरात पैशांची चणचण असायची. कर्ज फिटलेलं नसल्याने लोक घरी पैसे मागायला यायचे. तेव्हा दारावर माणसं आली की माझे पप्पा घाबरून लपायचे. पप्पा लपलेत हे मला कळायचं, पण का लपलेत हे तेव्हा कळायचं नाही."
advertisement
advertisement
advertisement
करण म्हणाला, "मी त्यांना बुर्ज खलिफा दाखवला, तिथे त्यांच्यासाठी खास खोली घेतली. इतकंच नाही, तर त्यांना 'स्काय डायव्हिंग'चं सरप्राईज दिलं. ४० वर्षं एका चौकटीत काम करणाऱ्या बाबांसाठी आणि आईसाठी आकाशातून झेप घेण्याचा तो अनुभव अविस्मरणीय होता. मला त्यांना इतका जग फिरवायचं आहे की, शेवटी त्यांनीच म्हटलं पाहिजे, बस आता, खूप फिरलो!"
advertisement







