परभणी हादरली! दारू सोडण्याचा दिला सल्ला, काकाने पुतण्याचा खून केला, वाचा सविस्तर...

Last Updated:

Parbhani News: आरोपी दिगंबर निवडंगे याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे गावात प्रत्येकजण त्याला दारू सोडण्यास सांगत होते. पुतण्या स्वप्निलनेही काका दिंगबरला 'दारू सोडून, समाजात बदनामी होतीय', असा...

Parbhani News
Parbhani News
Parbhani News: 'दारू सोडून दे, समाजात बदनामी होतीय', असा सल्ला देण्याचा पुतण्यावर दारूड्या काकाने चाकून वार करत जागेवरच संपवले. ही धक्कादायक घटना पूर्णा तालुक्याती मौजे हिवरा येथे शुक्रवारी (29 ऑगस्ट) घटली. चुडवा पोलिसांनी आरोपी काकाला ताब्यात घेतले आहे.
एकुलत्या एका पुतण्याचा खून
सविस्तर वृत्त असे की, स्वपिल देविदास निवडंगे (वय-30, रा, हिवरा, ता. पूर्णा) असे मृत्यू झालेल्या पुतण्याचे नाव आहे. तर त्याची हत्या करणाऱ्या चुलत्याचे नाव दिंगबर सोपान निवडंगे (वय-50) असे आहे. स्वप्निल गावात किराणा दुकान चालवत होता, तसेच साखर कारखान्यात क्रेन ऑपरेटर म्हणूनही काम करत होता. हिवरा येथे देविदास निवडंगे आणि आरोपी दिगंबर निवडंगे हे दोन भाऊ राहतात. देविदास यांना स्वप्निल हा एकुलता एक मुलगा होता. तर आरोपी दिगंबरला तीन मुली आहेत.
advertisement
उपचारापूर्वी वाटेतच झाला मृत्यू
आरोपी दिगंबर निवडंगे याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे गावात प्रत्येकजण त्याला दारू सोडण्यास सांगत होते. पुतण्या स्वप्निलनेही काका दिंगबरला 'दारू सोडून, समाजात बदनामी होतीय', असा सल्ला दिला. त्याचा राग मनात धरून काकाने शुक्रवारी स्वप्निलवर चाकून हल्ला चढविला. मानेवर, पोटावर आणि छातीवर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या स्वप्निलला ताबडतोड हाॅस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
परभणी हादरली! दारू सोडण्याचा दिला सल्ला, काकाने पुतण्याचा खून केला, वाचा सविस्तर...
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement