धक्कादायक! टीबी रुग्णावर भयंकर उपचार, अंधश्रद्धेने दुर्दैवी अंत
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
तिला उपचारांसाठी घेऊन जातेय असं सांगून मांत्रिकाकडे नेलं. बराच वेळ झाला तरी मुलगी घरी आली नाही म्हणून कुटुंबीयांनी आजूबाजूला चौकशी केली असता...
पप्पू पाण्डेय, प्रतिनिधी
अमेठी, 13 ऑगस्ट : मानव अंतराळात पोहोचला तरी आजही अनेक भागांमध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली माणसाचाच बळी दिला जातो, माणसांचीच आर्थिक लूटमार केली जाते. उत्तर प्रदेशच्या अमेठीतूनही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंधश्रद्धेतून एका 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. याप्रकरणी मांत्रिकासह इतर पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमेठीच्या हनुमान मिश्र गावातील रहिवासी असलेल्या श्यामकली यांची 20 वर्षीय मुलगी सपना ही टीबीने ग्रस्त होती. कुटुंबातीलच कौशिल्या नामक महिलेने 6 ऑगस्ट रोजी तिला उपचारांसाठी घेऊन जातेय असं सांगून नवऱ्यासह तिला एका मांत्रिकाकडे नेलं. बराच वेळ झाला तरी मुलगी घरी आली नाही म्हणून कुटुंबीयांनी आजूबाजूला चौकशी केली असता तिला शेजारच्या गावात मांत्रिकाकडे नेल्याचं कळलं.
advertisement
त्यानंतर श्यामकली यांनी तातडीने आपल्या पतीसह शेजारचं गाव गाठलं. तेथील एका घरात मंत्रोच्चार सुरू होते. मात्र घराचा दरवाजा बंद होता. त्यांनी ठोठावल्यानंतर कोणी दरवाजा उघडला नाही. खूप वेळ वाट पाहिली आणि अखेर याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि दरवाजा उघडला असता घरात अनेक माणसं होती आणि मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. कुटुंबीयांनी तिला बाहेर काढलं, मात्र काही वेळातच तिचा मृत्यू झाला. पोलीस तिथून परतल्यानंतर कुटुंबीयांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
advertisement
पोलिसांनी याबाबत कोणतीही तक्रार दाखल करून घेतली नव्हती. मात्र शनिवारी सपनाची आई श्यामकली या पोलीस स्थानकात दाखल झाल्या आणि त्यांनी मांत्रिकासह इतर पाच जणांविरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी एकूण 6 जणांविरोधात कलम 417 आणि 508 अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
Location :
Amethi,Lucknow,Uttar Pradesh
First Published :
August 13, 2023 8:44 PM IST