Wardha Crime : जादा परताव्याचे आमिष दाखवलं अन्...नागरीकांचे सगळेच पैसे बुडाले, वर्ध्यात काय घडलं?

Last Updated:

वर्ध्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत जादा परताव्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरीकांना लूटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

wardha crime
wardha crime
Wardha Crime News : नरेंद्र माटे, वर्धा : वर्ध्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत जादा परताव्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरीकांना लूटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. विक्रम पर्वत असे या घटनेतील मुख्य आरोपीचे नाव आहे,तर किरण पवार असे दुसऱ्या आरोपीचे नाव आहे.या दोन्ही आरोपींकडून 44.13 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,वर्ध्यात पीव्हीआर मल्टी ट्रेडींगच्या नावाखाली जादा परताव्याचे आमिष देऊन नागरीकांकडून गुंतवणूक करून घेतली जात होती. या आमिषाला बळी पडलेल्या गुंतवणूकदारांची आता फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.पोलिसांच्या पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला ही घटना कळताच त्यांनी हा घोटाळा उघड केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुख्य आरोपी विक्रम पर्वत आणि या फसवणूकीत साथ देणाऱ्या किरण पवार यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी 9 मोबाईल, लॅपटॉप, 22 एटीएम कार्ड, रोख व सोन्याच्या अंगठ्या तसेच आरोपीने स्वतः पैसे देऊन दुसऱ्याच्या नावाने खरेदी केलेल्या दोन कार असा एकूण 44 लाख 13 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच गुन्हयात बँकेतील रोख रक्क्म 8 लाख 71 हजार 116 रूपये जप्त करण्यात आले आहेत.त्याचसोबत आरोपींनी वर्धा येथील एका फायनान्स कंपनीत गहाण ठेवलेले 558.2 ग्रॅम व कोलकत्ता येथील एका फायनान्स कंपनीत गहाण ठेवलेले सुमारे 200 ग्रॅम सोने गोठविण्यात आले आहे.
advertisement
आता पोलिसांनी विक्रम पर्वत आणि किरण पवार या दोन्ही आरोपींची चौकशी सूरू केला आहे. या चौकशीतून आणखीण काय बाहेर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
Wardha Crime : जादा परताव्याचे आमिष दाखवलं अन्...नागरीकांचे सगळेच पैसे बुडाले, वर्ध्यात काय घडलं?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement