लग्नानंतर 3 वर्षांनी पत्नीचं कांड; कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट, एक फोन ठरला कारण

Last Updated:

घरी आल्यानंतरही ती सतत इतर मुलांशी फोनवर बोलत असते. तिला हे करण्यापासून थांबवलं की वाद घालते, असंही पतीने सांगितलं.

पत्नीचं मोठं कांड (प्रतिकात्मक फोटो)
पत्नीचं मोठं कांड (प्रतिकात्मक फोटो)
भोपाळ : एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यात संतापलेल्या पत्नीने पतीच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला आणि यात मोठा रक्तस्त्राव झाला . ही घटना मध्य प्रदेशातील रतलाम शहरातील त्रिवेणी रोड परिसरात घडली. पत्नीने पती आणि त्याच्या कुटुंबावर मारहाण करून घराबाहेर काढल्याचा गंभीर आरोपही केला आहे. मात्र, पत्नीने पतीवर हल्ला केल्याचा आरोप स्पष्टपणे फेटाळला आहे. पीडित पती हा व्यवसायाने मेकॅनिक आहे. पत्नी आपलं ऐकत नसल्याचा आरोप पतीने केला आहे. ती सकाळपासून रात्रीपर्यंत बाहेर फिरत असते, असं पती म्हणाला.
घरी आल्यानंतरही ती सतत इतर मुलांशी फोनवर बोलत असते. तिला हे करण्यापासून थांबवलं की वाद घालते, असंही पतीने सांगितलं. गुरुवारी रात्रीही पत्नी उशिरा घरी पोहोचली आणि अनोळखी व्यक्तीशी फोनवर बोलू लागली. याबाबत पतीने पत्नीला अडवल्याने पत्नी संतापली. त्यानंतर सकाळी तिने झोपलेल्या पतीवर धारदार शस्त्राने वार करून पतीच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला.
advertisement
रक्तबंबाळ झालेल्या पतीला आई-वडील आणि बहिणीने रतलामच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पीडितेच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, दोघांचं 2020 मध्ये लग्न झालं होतं. त्यांनी दलालाला पैसे देऊन वधू आणली होती. 2 वर्ष सर्व काही सुरळीत चाललं, पण गेल्या 2 वर्षांपासून पत्नीचे घरात वाद होऊ लागले. ती सकाळी बाहेर पडू लागली आणि संध्याकाळी घरी यायला लागली. थांबवल्यावर ती पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करायची.
advertisement
त्याचबरोबर महिलेने पती आणि सासरच्या मंडळींवर मारहाण आणि घरातून बाहेर काढल्याचा गंभीर आरोपही केला आहे. महिलेलाही रतलामच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महिलेचा आरोप आहे, ती झोपली असताना पतीने तिचा गळा दाबला आणि काच लागल्यामुळे तिच्या पतीच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत झाली. जखमी पतीवर जिल्हा रुग्णालयात उपचार करत असलेले डॉक्टर गोपाल यादव सांगतात की, रुग्णाची प्रकृती ठीक आहे. सध्या तो धोक्याबाहेर आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
लग्नानंतर 3 वर्षांनी पत्नीचं कांड; कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट, एक फोन ठरला कारण
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement