advertisement

Shenga Poli Recipe : बनवा सोलापूर स्पेशल शेंगा पोळी! प्रवासालाही घेऊन जाऊ शकता, 8 ते 10 दिवस सहज टिकेल

Last Updated:

Solapur special shenga poli recipe in marathi : ही पोळी प्रवासासाठी उत्तम आहे. कारण ही पोळी 8 ते 10 दिवस चांगली राहते. ही बनवायलाही एकदम सोपी आहे आणि जास्त वेळही लागत नाही.

शेंगा पोळी बनवण्याची पद्धत
शेंगा पोळी बनवण्याची पद्धत
मुंबई : चपात्या आणि पुरणाची पोळी तर आपण खाताच, पण तुम्ही कधी सोलापूरची खास 'शेंगा पोळी' खाल्ली आहे का? ही पोळी दिसायला अगदी पुरणाच्या पोळीसारखीच दिसते. हिची चवही अगदी अप्रतिम आहे. नावावरून तुम्हाला कळलंच असेल ही पोळी शेंगादाण्यापासून बनवली जाते. शेंगदाण्यांमुळे ही पोळी प्रोटीनयुक्त जेवण बनते.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही पोळी प्रवासामध्ये नेण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. कारण ही पोळी तब्बल 8 ते 10 दिवस चांगली राहते. ही बनवायलाही एकदम सोपी आहे आणि बनवायला जास्त वेळही लागत नाही. या शेंगा पोळीची रेसिपी rupali__kitchen या इनस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली गेली आहे.
शेंगा पोळीसाठी लागणारं साहित्य..
- शेंगदाणे
advertisement
- गूळ
- वेलचीपूड
- साखर
- गव्हाचं पीठ
- तूप
- मीठ
शेंगा पोळी बनवण्याची पद्धत
- सर्वात आधी शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घ्या.
- एका मिक्सरच्या भांड्यात साल काढलेले शेंगदाणे आणि गूळ घाला.
- एक कप शेंगदाणे असतील तर एकच कप गूळ घ्यायचा आहे.
- आता हे मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्या.
advertisement
- आता हे मिश्रण ताटात काढून त्यात वेलची पूड टाका.
- नंतर एका ताटात गव्हाचं पीठ घ्या.
- यामध्ये मीठ आणि थोडं तूप घालून त्याची कणिक मळून घ्या.
- कणिक मळून ती थोडावेळ सेट होण्यासाठी झाकून ठेवा.
- नंतर पोळी लाटायची आहे. यासाठी सारख्या आकाराचा कणकेचा आणि शेंगदाण्याच्या मिश्रणाचा गोळा घ्या.
advertisement
- कणकेच्या पिठाची वाटी करून त्यामध्ये शेंगदाण्याचा गोळा टाका.
- पिठाचा गोळा दाबून पुरणाच्या पोळीप्रमाणे व्यवस्थित लाटून घ्या.
- आता तेल किंवा तूप लावून ही पोळी तव्यावर भाजून घ्या.
- दोन्ही बाजूंनी अगदी खरपूस भाजा.



 










View this post on Instagram























 

A post shared by Rupali kitchen (@rupali__kitchen)



advertisement
अशाप्रकारे ही शेंगा पोळीची सोपी रेसिपी तयार आहे. ही पोळी तुम्ही प्रवासाला तर नऊच शकता. पण मुलांच्या डब्यातही देऊ शकता. मुलं अशी तर शेंगदाणे खात नाही. या पोळीच्या निमित्तानं त्यांच्या पोटातही शेंगदाणे जातात. तर एकदा नक्की ट्राय करा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Shenga Poli Recipe : बनवा सोलापूर स्पेशल शेंगा पोळी! प्रवासालाही घेऊन जाऊ शकता, 8 ते 10 दिवस सहज टिकेल
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement