Nagpur : सुनेने सासूच्या हत्येची दिली सुपारी, भावांच्या मदतीने संपवलं; चिमुकल्या लेकीमुळे हत्याकांडाचा उलगडा
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
सुनिता या वैशालीच्या चरित्रावर संशय घेत होता,तसेच सासूचा काटा काढला तर पूर्ण संपत्ती आपली होईल या विचारातून वैशालीने हत्या केली असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय.
उदय तिमांडे, प्रतिनिधी
नागपूर : नागपुरात सुनेनेच सासुची हत्या केल्याची घटना उघडकीस आलीय. संपत्तीच्या वादातून सुनेने सुपारी देऊन सासूला संपवलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुनेसह तिच्या दोन भावांना अटक केलीय. सुनेनं चुलत भावांना दोन लाख रुपयांची सुपारी दिली होती. हत्येच्या ८ दिवसांनी हा सर्व प्रकार उघड झाला. पाच वर्षांच्या चिमुकल्या नातीने दिलेल्या माहितीमुळे या प्रकरणाचा उलगडा झाला.
advertisement
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुनिता राऊत व 54 वर्षे असे मृत महिलेचे तर वैशाली राऊत, वय 32 वर्षे असं आरोपी सुनेचे नाव आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना आहे. पती आणि मुलाच्या मृत्यूनंतर मृत सुनिता राऊत या सून वैशाली आणि पाच वर्षाच्या नातीसोबत राहत होत्या. 28 ऑगस्ट रोजी हार्ट अटॅक मुळे सुनिता यांचा मृत्यू झाल्याचा बनाव सून वैशालीने केला होता. त्याच दिवशी सुनीता राऊत यांचा अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र सासू व सुनेत वाद झाला असल्याचे चर्चा शेजारील लोकांमध्ये रंगली होती.
advertisement
सुनिता राऊत यांच्या कुटुंबियांना मृत्यूबाबत संशय होता. त्यांनी मृतदेहाचे फोटोही काढून ठेवले होते. सुनिता यांच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास केला तेव्हा वैशालीच्या लहान मुलीने दिलेल्या माहितीमुळे सगळा पर्दाफाश झाला. वैशालीच्या पाच वर्षांच्या मुलीने दोन मामा घऱात आले होते आणि त्यांनी सुनिता यांना मारलं असं सांगितलं.
advertisement
चिमुकल्या मुलीने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी वैशालीच्या फोनचा डेटा तपासला. त्यात वैशालीने सुनिता यांच्या मृत्यूच्या आधी भाऊ श्रीकांत हिवसे आणि प्रकाश हिवसे यांना सतत फोन केल्याची माहिती समोर आली. वैशालीचे दोन्ही भाऊ हे मध्य प्रदेशातील पांढुरणा इथं राहतात. मृत सुनिता या वैशालीच्या चरित्रावर संशय घेत होता,तसेच सासूचा काटा काढला तर पूर्ण संपत्ती आपली होईल या विचारातून वैशालीने हत्या केली असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2024 7:57 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Nagpur : सुनेने सासूच्या हत्येची दिली सुपारी, भावांच्या मदतीने संपवलं; चिमुकल्या लेकीमुळे हत्याकांडाचा उलगडा


