"ऐश्वर्यासारखी जोडीदार म्हणजे..."; रुमर्ड GF समोर बायकोबाबत काय बोलला होता अभिषेक? VIDEO
- Published by:Minal Gurav
- trending desk
Last Updated:
Abhishek bachchan and nimrit kaur throwback video : निम्रत आणि अभिषेकच्या अफेअरच्या चर्चांदरम्यान एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत निम्रतसमोर अभिषेक बच्चन बायको ऐश्वर्याबद्दल काय बोलला माहितीये? व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
मुंबई : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा घटस्फोट झाला आहे, अभिषेकचे निम्रत कौरशी अफेअर आहे अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. 17 वर्षांपूर्वी अभिषेक-ऐश्वर्याने लग्न केलं होतं त्यांना एक मुलगी आहे. मात्र हे कपल आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सारखे चर्चेत आहे. निम्रत आणि अभिषेकच्या अफेअरच्या चर्चांदरम्यान एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत निम्रतसमोर अभिषेक ऐश्वर्याचं कौतुक करतो आणि ती काळजीपूर्वक अभिषेकचं म्हणणं ऐकताना दिसते.
अभिषेकने केलं होतं ऐश्वर्याचं कौतुक
या व्हिडिओत अभिषेक आणि निम्रत दिसत आहेत. हा व्हिडिओ 'दसवीं' चित्रपटाच्या प्रमोशनचा आहे. या चित्रपटात अभिषेक, निम्रत मुख्य भूमिकेत होते. अभिषेकने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की "माझी पत्नी खूप खूप कमालीची आहे. ती माझ्यासाठी एक अद्भुत भावनिक आधार आहे. मी खूप नशिबवान आहे, माझं कुटुंबही नशिबवान आहे. ऐश्वर्यासारखी जोडीदार असण्याची सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे ती याच फिल्डमध्ये आहे, त्यामुळे तिला या गोष्टी समजतात. ती माझ्यापेक्षा थोडं आधीपासून हे काम करतेय, त्यामुळे तिला हे जग माहीत आहे. या सगळ्यातून ती गेली आहे. त्यामुळे जेव्हा मी थकून घरी जातो तेव्हा मला समजून घेणारी व्यक्ती घरात असते."
advertisement
काळजीपूर्वक ऐकत होती निम्रत
अभिषेकचे जे बोलत होता ते निम्रत लक्षपूर्वक ऐकत होती. काहीवेळी ती त्याच्या बोलण्याला होकार देत होती. यात अभिषेक पुढे म्हणाला होता, "मी नेहमी पाहिलंय की ती एक अशी व्यक्ती आहे जिने तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळाचा खूप आदराने आणि सभ्यतेने सामना केला. तिच्या या गुणाचे मला खूप कौतुक वाटते. अभिनेते भावनिक असतात, आम्ही खूप संवेदनशील असतो. काही वेळा असं होतं की आम्हाला चिथवण्याचा प्रयत्न होतो आणि आम्ही चिडतो. तुम्ही फक्त एवढेच सहन करू शकता मात्र मी तिला असे करताना कधी पाहिले नाही."
advertisement
True but where is the disrespect by Aishwarya???? Even Jaya Bachchan has praised Aishwarya for forgetting her star image and stand behind. Don't talk about your mom here who disrespect your nalla fatherpic.twitter.com/D37QuBTzBz https://t.co/SlcU2zgqKJ
— Empress Aishwarya Fan (@badass_aishfan) October 19, 2024
advertisement
सध्या सोशल मीडियावर अभिषेक आणि निम्रत कौर यांच्या अफेअरच्या चर्चा होत आहेत. निम्रतमुळे अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा आला आहे, असे म्हटले जात आहे. 'दसवीं' चित्रपटात अभिषेक, निम्रतने एकत्र काम केलं होतं, त्यावेळी ते जवळ आले, असं म्हटलं जात आहे. मात्र या तिन्ही स्टार्सनी या अफवांवर प्रतिक्रिया दिलेली नाही.
advertisement
अभिषेकचा आगामी चित्रपट
अभिषेक शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये सुहाना खानदेखील आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'कहानी' फेम सुजॉय घोष करत आहेत. ऐश्वर्या राय बच्चन 'पोन्नियन सेल्वन 2'मध्ये शेवटची दिसली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 22, 2024 1:16 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
"ऐश्वर्यासारखी जोडीदार म्हणजे..."; रुमर्ड GF समोर बायकोबाबत काय बोलला होता अभिषेक? VIDEO