Malaika Arora Restaurant: मलायका अरोराच्या रेस्टॉरंटमध्ये मिळतो खास 'ठेचा', मेन्यू कार्ड होतंय व्हायरल!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Malaika Arora Restaurant: बी-टाऊनची ग्लॅमर गर्ल मलायका अरोरा सतत चर्चेत असणाऱ्या चेहऱ्यांपैकी एक आहे. गेल्या काही काळापासून ती सतत चर्चेत आहे. कधी ब्रेकअप, तर कधी मिस्ट्री मॅनसोबत फोटो तर कधी नवं रेस्टॉरंट यांमुळे मलायका नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
मुंबई : बी-टाऊनची ग्लॅमर गर्ल मलायका अरोरा सतत चर्चेत असणाऱ्या चेहऱ्यांपैकी एक आहे. गेल्या काही काळापासून ती सतत चर्चेत आहे. कधी ब्रेकअप, तर कधी मिस्ट्री मॅनसोबत फोटो तर कधी नवं रेस्टॉरंट यांमुळे मलायका नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अशातच आता मलायकाच्या नव्या रेस्टॉरंटचं मेन्यू कार्ड व्हायरल होतोय. यावर काही खास मेन्यू आणि किंमतही दिसतेय. मलायकाच्या या नव्या रेस्टॉरंटमध्ये काय खास मिळतं? याविषयी जाणून घेऊया.
मलायका अरोराने तिचा लेक अरहान खानसोबत मिळून वांद्रेमध्ये नवं रेस्टॉरंट सुरू केलंय. वांद्रेतील पाली गावातील मलायकाच्या रेस्टॉरंटचं नाव आहे 'स्कार्लेट हाऊस'. हे खास रेस्टॉरंट 90 वर्ष जुन्या इंडो-पोर्तुगीज बंगल्यात सुरू करण्यात आलं आहे. नुकतंच या रेस्टॉरंटचं मेन्यू कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
advertisement
मलायकाने तिच्या इंस्टास्टोरीवर तिच्या खास 'स्कार्लेट हाऊस' रेस्टॉरंटचं मेन्यू कार्ड शेअर केलं. यामध्ये तिनं खास मेन्यू काय आहे याची एक झलक दाखवली. 'मल्लाज स्पेशल' सेक्शन तिने चाहत्यांना दाखवला. फोटोमध्ये पाहून शकता, मलायकाच्या रेस्टॉरंटमध्ये स्पेशल पनीर ठेसा मिळतो. या पदार्थाची किंमत आहे 525. त्यानंतर मसाला खिचडी आहे, त्याची किंमत 550 आहे. याशिवाय खास मेन्यूमध्ये कॅरेमल्ज ओनियन पास्ताही आहे. याची किंमत 550 आहे.
advertisement

दरम्यान, मलायकाच्या रेस्टॉरंटचं मेन्यू कार्ड व्हायरल होताच चाहत्यांच्या कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव सुरू झाला आहे. आजवर अनेक सेलिब्रिटी लोकांनी या रेस्टॉरंटला भेट दिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 31, 2024 3:51 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Malaika Arora Restaurant: मलायका अरोराच्या रेस्टॉरंटमध्ये मिळतो खास 'ठेचा', मेन्यू कार्ड होतंय व्हायरल!







