Mandar Devasthali: 'माझेही 3.5 लाख थकवले', शशांक केतकरनंतर आणखी एका अभिनेत्याचे मंदार देवस्थळींवर गंभीर आरोप
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Shashank Ketkar: ५ जानेवारी २०२६ रोजी शशांकने एक स्फोटक व्हिडिओ आणि चॅट्सचे स्क्रीनशॉट्स शेअर करत सिनेसृष्टीतील पेमेंटच्या काळ्या बाजूवर प्रकाश टाकला आहे.
मुंबई: मराठी सिनेसृष्टीत सध्या एकच वाद रंगला आहे. अभिनेता शशांक केतकर याने दिग्दर्शक-निर्माते मंदार देवस्थळी यांच्याविरोधात पुकारलेल्या एल्गारामुळे आता अनेक कलाकारांनीही त्यांना आलेले अनुभव मोकळेपणाने मांडले आहेत. ५ जानेवारी २०२६ रोजी शशांकने एक स्फोटक व्हिडिओ आणि चॅट्सचे स्क्रीनशॉट्स शेअर करत सिनेसृष्टीतील पेमेंटच्या काळ्या बाजूवर प्रकाश टाकला आहे.
शशांकने घेतला मंदार देवस्थळींचा समाचार
शशांकने त्याच्या पोस्टमध्ये मंदार देवस्थळी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तो म्हणतो, ""मी legal action घेतोच आहे पण तूर्तास मंदार देवस्थळी (मंदार दादा) या उत्तम दिग्दर्शकाचा आणि हे मन बावरे या मालिकेच्या निर्मात्याचा थापा मारण्याचा पॅटर्न तुमच्याही लक्षात यावा या साठी हा video screenshots सकट पोस्ट करतो आहे. पैशाचा विषय स्वतः कधीही काढत नाही आणि आम्ही विषय काढला की तो रडतो, गया वया करतो, डार्लिंग, बाळा वगैरे म्हणतो आणि आम्ही कलाकार मूर्ख ठरतो." शशांकने पुढे असाही आरोप केला की, मानधनातून टॅक्स (TDS) कापला गेला, पण तो सरकारला भरलाच नाही. "हा तर दुहेरी गुन्हा आहे," असं म्हणत शशांकने आता कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार केला आहे.
advertisement
advertisement
संग्राम समेळचेही ३.५ लाख अडकले
शशांकच्या या पोस्टवर अभिनेता संग्राम समेळ यानेही आपली व्यथा मांडली. संग्रामने कमेंट केली की, "माझेही ३.५ लाख रुपये अजून मिळालेले नाहीत. ५ वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही आवाज उठवला होता, तेव्हा ४००-५०० लोक दादांच्या समर्थनाला उभे राहिले होते. त्या प्रत्येकाने ५००-५०० रुपये काढले असते तरी आमचे पैसे मिळाले असते." संग्रामच्या या कमेंटमुळे 'हे मन बावरे' मालिकेतील जवळपास सर्वच कलाकारांचे पैसे थकल्याचे समोर आले आहे.
advertisement

वादात अभिनेत्री प्राजक्ता दिघेंचीही उडी
या वादात आता 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांनी केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीवर गंभीर आरोप केला आहे.

advertisement
प्राजक्ता म्हणतात, "शशांक तू एक दम बरोबर केलं आहेस. आपल्या इंडस्ट्री मध्ये नाव मोठ आणि लक्षण खोट अशीच माणस बरीच आहेत. माझे सुद्धा एका मराठी अभिनेत्रीने, जिचं सोज्वळ ताई म्हणून नाव खूप मोठं आहे, लोकांचे पैसे द्यायचे आहेत म्हणून २ -३ महिन्यात परत देईन म्हणून ५ लाख घेतले आहेत आणि आज ४ वर्ष झाली तरी पैसे परत करत नाही आहे. गोष्टी मात्र करोडोमध्ये करते पण फक्त बाता. मैत्रीण आहे म्हणून गरजेला दिले पण आता माझा मैत्रीवरचा विश्वास उडाला."
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 9:15 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Mandar Devasthali: 'माझेही 3.5 लाख थकवले', शशांक केतकरनंतर आणखी एका अभिनेत्याचे मंदार देवस्थळींवर गंभीर आरोप









