'उंदराएवढा होता…' 42 दिवस प्री-मॅच्युअर जन्मलेला हा स्टारकिड, थर्माकोलच्या डब्यातून नेलेलं रुग्णालयात
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Famous Starkid : बॉलिवूडच्या एका स्टारकिडला जन्मताच आयु्ष्यासाठी झुंज द्यावी लागली होती. 42 दिवस प्री-मॅच्युअर जन्मलेल्या या स्टारकिडला थर्माकोलच्या डब्यातून रुग्णालयात नेण्यात आलं होतं.
Bollywood Starkid : बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिड्सनी अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले, पण बहुतेकांना प्रेक्षकांकडून विशेष प्रतिसाद मिळाला नाही. रवीना टंडन यांची मुलगी राशा ठडानी असो किंवा संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर. सगळ्यांचेच अभिनय पदार्पण अपयशी ठरले. पण या सगळ्यांमध्ये एक स्टारकिड असा होता, जो सर्वत्र चर्चेत आला. ना गाजावाजा, ना प्रमोशन—तरीसुद्धा पहिल्याच चित्रपटातून त्याने असा धमाका केला की सर्वत्र, प्रत्येकाच्या ओठांवर फक्त त्याच्याच चर्चा होऊ लागल्या. होय, आपण बोलत आहोत ‘सैयारा’ स्टार अहान पांडे याच्याबद्दल. तुम्हाला माहिती आहे का की पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या स्टारकिडचे आयुष्य जन्मताच अडचणीत होते? जाणून घ्या अहानशी संबंधित रंजक गोष्ट.
42 दिवस प्री-मॅच्युअर जन्मलेला अहान पांडे
अहान पांडेची आई डियाने पांडे आणि बहीण अलाना यांनी त्यांच्या जन्माशी संबंधित गोष्ट शेअर केली होती. या विषयावर बोलताना डियाने खूपच भावूक झाल्या होत्या. डियाने यांनी पहिल्यांदाच अहानच्या जन्माची अशी स्टोरी सांगितली, जी कोणालाही भावूक करेल. त्यांनी सांगितले की अहान 42 दिवस प्री-मॅच्युअर जन्मला होते. त्यामुळे त्याची अवस्था खूपच गंभीर होती.
advertisement
गंभीर अवस्थेत करण्यात आली शस्त्रक्रिया
डियाने यांनी अहानच्या जन्माचा किस्सा आठवताना सांगितले की त्यांची वॉटर बॅग हळूहळू गळू लागली होती. जेव्हा हे पुन्हा घडले, तेव्हा डॉक्टरांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर सोनोग्राफी करण्यात आली, तेव्हा कळले की सगळे अम्नियोटिक फ्लुइड निघून गेले आहे आणि अहान गर्भात एका कोपऱ्यात आकसून पडला आहे. ही बातमी ऐकून संपूर्ण कुटुंब चिंतेत पडले. डॉक्टरांनी तातडीने आपत्कालीन सी-सेक्शनची तयारी सुरू केली.
advertisement
उंदराएवढा होता मुलगा
आठवणी सांगताना डियाने भावूक झाल्या आणि म्हणाल्या की अहानचा जन्म झाला तेव्हा तो अक्षरशः उंदराएवढा होता. डियाने म्हणाल्या,“डॉक्टरांनी जेव्हा अहानला बाहेर काढले, तेव्हा तो अगदी उंदरासारखा दिसत होता. त्यांनी त्याला लगेच तिथून नेले आणि त्यानंतर मी बेशुद्ध झाले. शुद्धीवर आल्यानंतर मी मुलाबद्दल विचारले, तेव्हा मला सांगण्यात आले की त्याला दुसऱ्या रुग्णालयातील एनआयसीयूमध्ये नेण्यात आले आहे". आईचे बोलणे ऐकत असताना अलानानेही प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की अहानला थर्माकोलच्या डब्यात ठेवून नानावटी रुग्णालयात नेण्यात आले होते.
advertisement
10 दिवस रुग्णालयात दाखल होता अहान
view commentsडियाने यांनी सांगितले की अहानची अवस्था पाहून त्याला एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. मुलाला ब्रेस्टफीड देण्यासाठी डियाने स्वतःही 10 दिवस रुग्णालयातच राहिल्या. जेव्हा त्या मुलाला भेटायला गेल्या, तेव्हा त्यांनी पाहिले की त्याच्या पायाला एक काठी लावलेली होती. विचारणा केल्यावर कळले की त्याला हेअरलाईन फ्रॅक्चर झाले होते. उल्लेखनीय म्हणजे, अहान पांडे हा बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे यांचे भाऊ चिक्की पांडे यांचा मुलगा आहे. चिक्की पांडे स्वतः अभिनयापासून दूर राहिले असले, तरी बॉलिवूडमधील अनेक मोठ्या स्टार्सशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. विशेषतः शाहरुख खान आणि त्यांच्या कुटुंबाशी पांडे कुटुंबाचे अतिशय जवळचे नाते आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 26, 2025 8:15 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'उंदराएवढा होता…' 42 दिवस प्री-मॅच्युअर जन्मलेला हा स्टारकिड, थर्माकोलच्या डब्यातून नेलेलं रुग्णालयात










