Eclipse 2026: नवीन 2026 वर्षातील सूर्य-चंद्र ग्रहणे 3 राशींना फार अनलकी; काळीकुट्ट छाया अडचणीत आणेल

Last Updated:
Eclipse 2026: ग्रहण लागण्याच्या घटनेला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. ग्रहणांना अशुभ मानले जाते. विज्ञानाच्या दृष्टीने सूर्य आणि चंद्र ग्रहण ही एक नैसर्गिक खगोलीय घटना असली, तरी ज्योतिष शास्त्र आणि हिंदू धर्मात या काळाकडे खूप संवेदनशील आणि महत्त्वाचा काळ म्हणून पाहिलं जातं. परंपरेनुसार सूर्य आणि चंद्र ग्रहण हे शुभ कार्यांसाठी अनुकूल मानले जात नाहीत. या काळात माणसाच्या आयुष्यात मानसिक, भावनिक आणि भौतिक पातळीवर बदल जाणवू शकतात. त्यामुळे अनेकजण या काळात विशेष काळजी घेतात. 2026 मध्ये होणारी ग्रहणे कोणत्या राशींवर परिणाम करू शकतात, याविषयी जाणून घेऊ.
1/5
2026 चे पहिले सूर्य ग्रहण - 2026 मधील पहिले सूर्य ग्रहण 17 फेब्रुवारी 2026 रोजी माघी अमावस्येला होईल. हे ग्रहण कुंभ राशीत, शतभिषा नक्षत्रात होणार असून ते वलयाकार सूर्य ग्रहण असेल. या प्रकारच्या ग्रहणात सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येतात, पण चंद्र पृथ्वीपासून थोडा दूर असल्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. त्यामुळे सूर्याभोवती एक तेजस्वी कड्यासारखं वलय दिसतं.

advertisement
2/5
कुंभ राशीवर परिणाम - हे सूर्य ग्रहण कुंभ राशीच्या लोकांसाठी आत्मपरीक्षण आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ आणेल. करिअरमध्ये बदल, नवीन जबाबदाऱ्या किंवा दिशाबदल होण्याचे संकेत मिळू शकतात. सामाजिक नातेसंबंधांमध्ये दुरावा किंवा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. मानसिक ताण वाढू शकतो, त्यामुळे संयम ठेवणं गरजेचं आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. या काळात घाईघाईने कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. तुमच्या योजना आणि विचार शक्यतो गुप्त ठेवा.

3/5
2026 चे पहिले चंद्र ग्रहण - 2026 मधील पहिले चंद्र ग्रहण 3 मार्च 2026 रोजी होळी पौर्णिमेला होईल. या ग्रहणाचा प्रभाव कन्या राशीवर दिसून येईल. चंद्र ग्रहण कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अचानक बदल घडवून आणू शकतं. आत्मविश्लेषण वाढेल आणि काही गोष्टी नव्याने समजतील. नोकरी किंवा कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. भावनिक चढउतार वाढू शकतात. कौटुंबिक बाबींमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्रास वाढू शकतो. या काळात जुनी अपूर्ण कामं पूर्ण करणं आणि कामे संतुलित ठेवणं फायदेशीर ठरेल.

4/5
2026 चे दुसरे सूर्य ग्रहण - 2026 मधील दुसरे सूर्य ग्रहण 12 ऑगस्ट 2026 रोजी होईल. हे पूर्ण सूर्य ग्रहण म्हणजेच खग्रास सूर्य ग्रहण असेल. मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नाही. आफ्रिका, युरोप, आर्क्टिक भाग, स्पेन, उत्तर अमेरिका, ग्रीनलँड आणि आइसलँड या भागांमध्ये ते पाहता येईल. जरी भारतात दृश्य नसलं तरी ज्योतिषीयदृष्ट्या त्याचा प्रभाव जाणवू शकतो.

5/5
2026 चे दुसरे चंद्र ग्रहण - 2026 मधील दुसरे चंद्रग्रहण 28 ऑगस्ट 2026 रोजी होईल. या ग्रहणाचा प्रभाव मीन राशीवर अधिक जाणवेल. हे ग्रहण मीन राशीच्या लोकांसाठी विशेष प्रभावी मानलं जात आहे. मानसिक गोंधळ वाढू शकतो आणि निर्णय घेणं कठीण जाऊ शकतं. आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहणं गरजेचं आहे. नातेसंबंधांमध्ये भावनिक अस्थिरता जाणवू शकते. मात्र आध्यात्मिकतेकडे ओढ वाढू शकते. ध्यान, प्रार्थना आणि आत्मचिंतन केल्यास मनाला शांती मिळेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Gold Silver Return 2026 Prediction: सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सांगितलं
सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा
  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

View All
advertisement