Rohit Sharma : विजय हजारे ट्रॉफीमध्ये रोहित बनला संकटमोचक, शार्दुल ठाकूरच्या मदतीला धावला 'हिटमॅन', पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rohit Sharma Viral Video : मुंबईचा कॅप्टन शार्दुल ठाकुर फील्ड सेटिंग आणि बॉलिंग चेंजबाबत काहीसा गोंधळलेला दिसला. अशावेळी रोहित शर्माने पुढे येत शार्दुलला मोलाची मदत केली.
Rohit Sharma guiding captain Shardul Thakur : टी-ट्वेंटी आणि टेस्ट फॉरमॅटमधून निवृत्ती घेऊन बसलेला रोहित शर्मा आता डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळत आहे. सध्या तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपली प्रतिभा दाखवतोय. सिक्कीम विरुद्धच्या मॅचमध्ये रोहित शर्माने आपल्या अनुभवाच्या जोरावर मुंबईला सोपा विजय मिळवून दिला. रोहितने या मॅचमध्ये केवळ बॅटिंगनेच नाही, तर आपल्या कॅप्टन्सी माईंडसेटने सर्वांची मनं जिंकली.
शार्दुल गोंधळला, रोहित धावला
मुंबई आणि सिक्किम मॅच दरम्यान मुंबईचा कॅप्टन शार्दुल ठाकुर फील्ड सेटिंग आणि बॉलिंग चेंजबाबत काहीसा गोंधळलेला दिसला. अशावेळी रोहित शर्माने पुढे येत शार्दुलला मोलाची मदत केली. रोहितचा प्रदीर्घ अनुभव यावेळी टीम इंडियाच्या या खेळाडूच्या कामी आला आणि मॅचवर मुंबईने पकड मिळवली. मुंबईकडून खेळताना रोहित शर्माने सिक्कीम विरूद्ध 155 धावांची खेळी केली होती.या खेळीच्या बळावर त्याने एकट्याने मुंबईला सामना जिंकून दिला. तसेच या खेळीमुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कारही देण्यात आला होता.
advertisement
advertisement
2016 नंतर रोहित पहिल्यांदाच...
मैदानात फील्डिंग करत असताना चाहत्यांनी रोहितचे जंगी स्वागत केले. सुमारे 20,000 प्रेक्षकांच्या उपस्थितीत स्टेडियम "रोहित, रोहित" अशा घोषणांनी दुमदुमून गेलं होतं. 2016 नंतर रोहित पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत असल्याने फॅन्समध्ये वेगळीच क्रेझ होती.
वडापाव खाणार का?
दरम्यान, रोहित बाउंन्ड्री लाईनवर फिल्डींग करत असताना काही चाहते त्याच्या मागून रोहित भाऊ वडापाव खाणार का? अशी ऑफर देतात. यावर रोहित शर्मा हात वरून नको रे बाबा अशी रिअॅक्शन देताना दिसला आहे. रोहितही ही रिअॅक्शन पाहून सगळे पोट धरून हसले. या मजेशीर प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांनी याला रोहितचे मुंबईशी असलेले घट्ट नातं असल्याचे म्हटलं आहे. याचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतोय.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 26, 2025 7:24 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : विजय हजारे ट्रॉफीमध्ये रोहित बनला संकटमोचक, शार्दुल ठाकूरच्या मदतीला धावला 'हिटमॅन', पाहा Video









