हॉटेलमध्ये जेवताना ताटात पाणी उडालं; टोकलं म्हणून थेट चाकूने सपासप हल्ला, पिंपरीतील संतापजनक प्रकार
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
जेवण सुरू असताना वेटर तिथे आला आणि टिश्यू पेपर उचलत असताना त्याच्या हातातील पाण्याचे थेंब आशुतोष यांच्या ताटात पडले. या प्रकारामुळे आशुतोष यांनी वेटरला टोकले आणि व्यवस्थित काम करण्यास सांगितले.
पिंपरी: पिंपरीतील एका हॉटेलमध्ये जेवताना किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वेटरच्या हातातील पाणी ताटात उडाल्याने त्याला जाब विचारला असता, दोन जणांनी ग्राहकावर हल्ला केला. चक्क किचनमधील चाकूने ग्राहकावर वार केले. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
नेमकी घटना काय?
आशुतोष पांडुरंग काटे (वय ३३, रा. पिंपळे सौदागर) हे मंगळवारी (२३ डिसेंबर) सायंकाळी आपल्या मित्रांसह पिंपरीतील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण सुरू असताना वेटर तिथे आला आणि टिश्यू पेपर उचलत असताना त्याच्या हातातील पाण्याचे थेंब आशुतोष यांच्या ताटात पडले. या प्रकारामुळे आशुतोष यांनी वेटरला टोकले आणि व्यवस्थित काम करण्यास सांगितले.
advertisement
वेटरने लगेचच दोघांना बोलवून घेतला. वेटरला टोकल्याचा राग मनात धरून दोन आरोपींनी आशुतोष यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी त्यांना अश्लील शिवीगाळ केली आणि संतापच्या भरात किचनमधून कांदा कापण्याचा स्टीलचा चाकू आणून आशुतोष यांच्या नाकावर जोरात वार केला. या हल्ल्यात आशुतोष गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर आशुतोष काटे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी विशाल आणि मोनू बहोत या दोघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ऐन गर्दीच्या वेळी हॉटेलमध्ये घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 26, 2025 7:13 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
हॉटेलमध्ये जेवताना ताटात पाणी उडालं; टोकलं म्हणून थेट चाकूने सपासप हल्ला, पिंपरीतील संतापजनक प्रकार








