Aajache Rashibhavishya: खूप सोसलं! आता तुमचा दिवस आला, पण शुक्रवारी ‘या’ चुका टाळा, मेष ते मीन आजचं राशीभविष्य
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Daily Horoscope: आजचा शुक्रवार मेष ते मीन राशींसाठी खास आहे. नाशिकचे ज्योतिषी नरेंद्र धरणे यांनी पैसा, प्रेम, प्रतिष्ठा, आरोग्य, नोकरी, करिअर यांबाबत आजचं राशीभविष्य सांगितलं आहे.
मेष राशी -तुमच्याकडून घेतलेला एखादा चुकीचा निर्णय संबंधितांवर विपरीत परिणाम करण्याबरोबरच तुम्हाला मानसिक तणावात टाकणारा ठरेल. आज तुम्हाला आपल्या संतानमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे, यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. कार्यक्षेत्रात कुठल्या कामात खराबी असल्यामुळे तुम्ही आज चिंतीत राहू शकता. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.
advertisement
वृषभ राशी -तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. तुमच्या प्रेम जीवनातील हा एक अत्यंत सुंदर दिवस असेल. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुसऱ्यांच्या दडपणाखाली वावरू नका. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.
advertisement
मिथुन राशी- एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही कुणाच्या मदतीशिवाय धन कमावण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल, तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा. आज तुमचा शुभ अंक 2 असणार आहे.
advertisement
कर्क राशी - पैशांची स्थिती आणि आर्थिक अडचणी ताणतणावाचे कारण ठरतील. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. उद्योग व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. प्रलंबित कामामुळे प्रचंड व्यस्त व्हाल - त्यामुळे आराम करायला आज फुरसत मिळणार नाही. आज तुमचा शुभ अंक 5 असणार.
advertisement
advertisement
कन्या राशी -आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. स्वतःचेच कौतुक करून घेण्यासाठी आणि स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी उत्कृष्ट दिवस. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा, एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. तुमचा/तुमची जोडीदार आज दिवसभर तुमचा विचार करेल. आज तुमचा शुभ अंक 2 असणार आहे.
advertisement
तुळ राशी -अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. घरातील लहान-लहान गोष्टींवर आज तुमचे खूप धन खर्च होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावात येऊ शकता. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप वैमनस्य निर्माण करू शकतो. पगारातील वाढ तुम्हाला उल्हसित करेल. आज तुमचे शुभ अंक 4 असणार आहे.
advertisement
वृश्चिक राशी - तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. विशुद्ध प्रेमाचा तुम्हाला अनुभव मिळणार आहे. त्यामुळे त्यासाठी थोडा वेळ राखून ठेवा. आज तुम्ही प्रकाशझोतात राहाल आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. आपल्या घर कुटुंबासोबत वेळ घालवण्याची गरज असते. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यात छोट्या छोट्या कारणावरून भांडण होईल परंतु त्यामुळे दीर्घकाळपर्यंत तुमचे वैवाहिक जीवन बिघडून जाईल. 6 हा तुमचा शुभ अंक असणार आहे.
advertisement
धनु राशी - निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल - कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. आपला काही वेळ इतरांना देण्यासाठी चांगला दिवस. जे लोक आत्तापर्यंत बेरोजगार आहेत त्यांना चांगली नोकरी मिळवण्यासाठी अधिक मेहनत करण्याची आहे. मेहनत करूनच तुम्हाला योग्य परिणाम मिळतील. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.
advertisement
मकर राशी - ग्रह नक्षत्रांची चाल तुमच्यासाठी आज चांगली नाही. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या धनाला खूप सुरक्षित ठेवले पाहिजे. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. बॉस तुमच्याशी नेहमी उद्धटपणे का वागतो या मागचे सत्य तुम्हाला आज कळेल. त्यामुळे निश्चितच तुम्हाला बरे वाटेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वागण्याचा कदाचित गैरसमज करून घ्याल, ज्यामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल. आज तुमचा शुभ अंक 2 असणार आहे.
advertisement
कुंभ राशी - तणावाकडे दुर्लक्ष करू नका. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. मुलं तुम्ही लक्ष देण्याची अपेक्षा करतील, अर्थात त्यातून तुम्हाला आनंदच मिळेल. प्रणयराधना करण्याची भावना जोडीदाराकडून आज अनुभवता येईल. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.
advertisement
मीन राशी - प्रत्येक माणसांचे सांगणे ऐका, कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. आज तुम्ही कुणाच्या मदतीशिवाय धन कमावण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळा होऊ पाहत होते, त्यांच्या कारकिर्दीची आज तुमच्या डोळ्यादेखत उतरंड सुरू होईल. आज आयुष्य दिवस सुंदर होणार आहे. आज तुमचा शुभ अंक 7 आहे.
advertisement







