आलिया-रणबीरनं चाहत्यांना दिलं ख्रिसमसचं खास गिफ्ट, राहाची पहिली झलक समोर, Video
- Published by:Minal Gurav
Last Updated:
ख्रिसमसच्या मुहूर्तावर आलिया आणि रणबीर यांनी आपल्या लेकीचा चेहरा सर्वांसमोर आणला आहे. दोघांनी चाहत्यांना ख्रिसमसचं खास गिफ्ट दिलं आ
मुंबई, 25 डिसेंबर : बॉलिवूड स्टारकिड्सची सध्या बॉलिवूडमध्ये खूप चर्चा आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी मागील 2 वर्षात बाळाला जन्म दिला आहे. अभिनेत्री आलिया भट्ट देखील आई झाली. राहा या गोंडस मुलीला आलियानं जन्म दिला. राहाच्या जन्मानंतर आलियानं आतापर्यंत तिचा चेहरा कोणालाही दाखवला नव्हता. राहा नेहमी कशी दिसते हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक होते. अखेर ख्रिसमसच्या मुहूर्तावर आलिया आणि रणबीर यांनी आपल्या लेकीचा चेहरा सर्वांसमोर आणला आहे. दोघांनी चाहत्यांना ख्रिसमसचं खास गिफ्ट दिलं आहे.
विरल भयानीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवरून राहाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हाइट रंगाचा क्यूट फ्रॉक, पायात लाल रंगाचे शुज, केसांच्या दोन पोनी त्यावर पिंक कलरचे क्यूट किप्स घातलेली चिमुकली राहा सर्वांसमोर आली आहे. गोड-गोंडस गोऱ्यापान राहावर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होतोय.
advertisement
राहाचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 साली झाला. आलियानं राहाच्या जन्मआधी 14 एप्रिल 2022 रोजी आलिया आणि रणबीर यांनी लग्न केलं. लग्नाच्या दुसऱ्या महिन्यातच आलियानं ती प्रेग्नंट असल्याची बातमी दिली. नोव्हेंबर महिन्यात कपूर घराण्यात नातीचा जन्म झाला. नुकताच राहाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. राहाच्या पहिल्या बर्थडेनंतर काही दिवसातच आलिया आणि रणबीर यांनी तिचा चेहरा सर्वांसमोर आणला आहे.
advertisement
पहिल्यांदाच राहाला पाहिल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. राहा तिच्या आजोबांसारखी म्हणजेच ऋषि कपूर यांच्यासारखी दिसते असं अनेकांनी म्हटलं आहे. तर काहींनी तिला छोटी करीना देखील म्हटलं आहे. राहाच्या क्यूटनेसनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्याचप्रमाणे आता राहाचे आणखी फोटो आणि व्हिडीओ देखील पाहायला मिळणार यासाठी आनंद व्यक्त केला आहे. इतकंच नाही तर तैमूर आणि जेलहा टक्कर देण्यासाठी राहाची एंट्री झाली आहे असंही अनेकांनी म्हटलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 25, 2023 2:21 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
आलिया-रणबीरनं चाहत्यांना दिलं ख्रिसमसचं खास गिफ्ट, राहाची पहिली झलक समोर, Video