अल्लू अर्जुन गर्दीत अडकला, बायकोला वाचवण्यासाठी 'पुष्पा'ने अक्षरश: हात जोडले
- Published by:Minal Gurav
Last Updated:
'पुष्पा 2' च्या प्रीमियरला अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी झालेली गर्दी आणि चेंगराचेंगरीत गेलेल्या एका महिलेचा जीव हे प्रकरण खूप चर्चेत आलं. अल्लू अर्जुनला जेलमध्ये जावं लागलं. ती घटना अजूनही ताजी असताना आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
आपल्या आवडत्या कलाकाराला पाहण्यासाठी चाहते नेहमीच गर्दी करतात. या गर्दीतून स्वत: बाहेर काढताना कलाकारांच्याही नाकी नऊ येतात. काही दिवसांआधी अभिनेत्री निधी अग्रवाल आणि समांथा प्रभूसोबतही अशीच घटना घडली होती. चाहत्यांनी दोघींच्या भोवती इतकी गर्दी केली होती. त्यातून त्यांना बाहेर पडणं कठीण झालं. प्रचंड धक्काबुक्कीतून दोघींना बाहेर काढण्यात आलं.
त्यानंतर आता अभिनेता अल्लू अर्जुनभोवती चाहत्यांनी गर्दी केली. यावेळीचाहते नाही तर अल्लू अर्जुन गर्दीत अडकला. अल्लू अर्जुन एकटाच नाही तर त्याची बायकोही त्याच्याबरोबर आहे. अल्लू अर्जुन त्याची पत्नी स्नेहा रेड्डीबरोबर हैदराबादमधील कॅफे निलोफर येथे गेला असता त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. अल्लू अर्जुन गर्दीला रस्ता सोडून मागे हटण्याची विनंती करताना दिसला. अल्लू बायकोसोबत गर्दीत अक्षरश: चेंगरला. गर्दीपासून वाचवण्यासाठी तो त्याच्या पत्नीचा हात धरून ठेवला होता. कॅफेतून बाहेर येऊन कारमध्ये बसणंही दोघांसाठी कठीण झालं होत.
advertisement
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, अल्लू अर्जुन स्नेहाला धरून बसलेला दिसतो, तर लोक त्यांच्यासोबत सेल्फी आणि व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी करत होते. सुरक्षा रक्षकांची उपस्थिती असूनही गर्दी वाढतच होती. अल्लू अर्जुन स्नेहाला सुरक्षितपणे कारमध्ये बसू देण्यासाठी चाहत्यांना बाजूला होण्याची विनंती करताना दिसत होता. कॅफे कर्मचाऱ्यांनीही या मदत केली.
advertisement
इतकं सगळं करूनही बाहेरील गर्दीही कमी झाली नाही. चाहते त्यांच्या गाडीच्या मागे फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते. अल्लू अर्जुनने पुन्हा एकदा लोकांना त्यांच्या पत्नीला गाडीत बसण्यासाठी रस्ता मोकळा करण्याचे आवाहन केले. स्नेहा सुरक्षितपणे आत गेल्यानंतर अल्लू अर्जुन चाहत्यांचा निरोप घेऊन निघून गेला.
Allu Arjun had a hard time at Niloufer Cafe.
When @alluarjun and Sneha Reddy went to the cafe in Hitech City, fans surrounded them for selfies. The crowd was so big that the couple struggled to leave and get into their car.#AlluArjun #Hyderabad #News pic.twitter.com/2z1PuKS9aI
— MKJ (@1nonly_MKJ) January 5, 2026
advertisement
यापूर्वी, अल्लू अर्जुन हैदराबादमधील कोकापेट येथील अल्लू सिनेमाच्या सॉफ्ट ओपनिंगला उपस्थित होता. तो त्याचा मुलगा अयानसोबत पोज देतानाही दिसला.
'पुष्पा' स्टारर अल्लू अर्जुन आणि त्याच्यामागे होणारी गर्दी हा विषय आता नवीन राहिलेला नाही. काही महिन्यांआधी पुष्पा 2च्या प्रीमियरला अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी झालेली गर्दी आणि चेंगराचेंगरीत गेलेल्या एका महिलेचा जीव हे प्रकरण खूप चर्चेत आलं. अल्लू अर्जुनला जेलमध्ये जावं लागलं. ती घटना अजूनही ताजी असताना आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 9:56 AM IST









