प्रवाशांनो लक्ष असू द्या; मराठवाड्यातील 15 रेल्वे गाड्या आता नवीन वेळेनुसार धावणार, एका क्लिकवर पाहा वेळापत्रक
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
या बदलांमुळे नांदेड मंडळातून धावणाऱ्या किंवा थांबणाऱ्या एकूण 15 गाड्यांच्या वेळेत फेरफार करण्यात आला आहे. यात हाय-स्पीड वंदे भारत एक्स्प्रेसचाही समावेश आहे.
जालना : नवीन वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण मध्य रेल्वेने (SCR) प्रवाशांसाठी सुधारित वेळापत्रक जारी केले आहे. 1 जानेवारी 2026 पासून हे नवे वेळापत्रक लागू झाले असून, त्यानुसार गाड्या धावत आहेत. या बदलांमुळे नांदेड मंडळातून धावणाऱ्या किंवा थांबणाऱ्या एकूण 15 गाड्यांच्या वेळेत फेरफार करण्यात आला आहे. यात हाय-स्पीड वंदे भारत एक्स्प्रेसचाही समावेश आहे.या बदलांनुसार नांदेड, साईनगर शिर्डी, मुंबई आणि फिरोजपूर या ठिकाणांहून सुटणाऱ्या किंवा तिथे पोहोचणाऱ्या गाड्यांच्या वेळेत 5 ते 15 मिनिटांपासून अर्धा तासापर्यंतचा फरक पडला आहे. हे बदल परिचालनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी करण्यात आले आहेत.
advertisement
काही प्रमुख गाड्यांच्या नव्या वेळा:
advertisement
advertisement
advertisement
याशिवाय काकीनाडा - साईनगर एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, तिरुपती एक्स्प्रेस आणि नगरसोल एक्स्प्रेस यांच्या वेळापत्रकातही किरकोळ बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांनी प्रवासापूर्वी नवे वेळापत्रक तपासावे, असे रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे.जालना रेल्वे स्थानकावर आता एटीएम सुविधा उपलब्धप्रवाशांच्या दीर्घकाळाच्या मागणीनंतर जालना रेल्वे स्थानकावर एटीएमची सुविधा सुरू झाली आहे. रेल्वेने जीआरपी पोलिस ठाण्याजवळ नवीन एटीएम बूथ उभारला आहे. यापूर्वी पैशांसाठी प्रवाशांना स्थानकाबाहेर जावे लागत होते, विशेषतः रात्रीच्या वेळी याची मोठी गैरसोय होत होती. आता ही सुविधा उपलब्ध झाल्याने, विशेषतः रात्रीच्या गाड्यांच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 10:07 AM IST
मराठी बातम्या/जालना/
प्रवाशांनो लक्ष असू द्या; मराठवाड्यातील 15 रेल्वे गाड्या आता नवीन वेळेनुसार धावणार, एका क्लिकवर पाहा वेळापत्रक










