प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, अमरावती-मुंबई विमानसेवेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल, नवीन इथं चेक करा

Last Updated:

अमरावती-मुंबई-अमरावती या विमानसेवेच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल होणार आहेत. 7 जानेवारीपासून ही विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

Amaravati News
Amaravati News
अमरावती : मुंबई-अमरावती या विमानसेवेच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल होणार आहेत. 7 जानेवारीपासून ही विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. उड्डाणाच्या वेळेत बदल करण्यात आल्याने प्रवाशांना पुन्हा नव्या वेळापत्रकाची माहिती घेणे आवश्यक ठरणार आहे. गेल्या महिन्यात दाट धुक्यामुळे 1 ते 15 डिसेंबरदरम्यान ही विमानसेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर सेवा सुरू करण्यात आली, मात्र ती केवळ आठवड्यातून दोनच दिवस उपलब्ध होती. त्यामुळे नियमित प्रवासी, व्यापारी आणि नोकरदार वर्गाची मोठी गैरसोय झाली होती.
असे असणार नवीन वेळापत्रक
हिवाळी वेळापत्रकानुसार 2 जानेवारीपासून आठवड्यातून चार दिवस विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, जानेवारी महिन्यासाठी पुन्हा एकदा वेळेत बदल जाहीर करण्यात आला आहे. अलायन्स एअरकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 7 ते 30 जानेवारीदरम्यान मुंबईहून सकाळी 9.55 वाजता विमान उड्डाण घेऊन 11.40 वाजता अमरावती विमानतळावर पोहोचेल. त्यानंतर अमरावतीहून दुपारी 12.05 वाजता विमान मुंबईकडे झेपावेल आणि 1.50 वाजता मुंबईत पोहोचेल.
advertisement
ही विमानसेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार या चार दिवस उपलब्ध राहणार आहे. आठवड्यातून चार दिवस सेवा सुरू झाल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी वारंवार बदलणारे वेळापत्रक प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
1 फेब्रुवारीपासून पुन्हा बदल
दरम्यान, अलायन्स एअरने दिलेल्या माहितीनुसार 1 फेब्रुवारीपासून पुन्हा सकाळच्या वेळापत्रकानुसार विमानसेवा सुरू होणार आहे. त्यानुसार मुंबईहून सकाळी 7.05 वाजता उड्डाण घेऊन 8.50 वाजता अमरावतीत आगमन होईल, तर अमरावतीहून सकाळी 9.15 वाजता उड्डाण घेऊन 10.30 वाजता मुंबईत पोहोचेल.
advertisement
अमरावती विमानतळाचे प्रबंधक राजकुमार पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 जानेवारीपासून विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरू होत असून, नव्या वेळापत्रकानुसार अमरावतीहून दुपारी 12.05 वाजता विमान मुंबईकडे झेपावेल, तर मुंबईहून सकाळी 11.45 वाजता अमरावती विमानतळावर लँडिंग होईल. वेळापत्रकात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत असून, स्थिर आणि निश्चित वेळापत्रक लवकर जाहीर करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
view comments
मराठी बातम्या/अमरावती/
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, अमरावती-मुंबई विमानसेवेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल, नवीन इथं चेक करा
Next Article
advertisement
US Attack Venezuela Gold Price: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदाजाने गुंतवणूकदारांची झोप उडणार!
अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदा
  • अमेरिकेने व्हेनेझुएला देशावर हल्ला करत राष्ट्रपती मादुरो यांना अटक केली.

  • व्हेनेझुएला हा देश सर्वाधिक तेल उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक

  • अमेरिकेच्या हल्ल्याचे परिणाम बाजारावरही होणार असल्याचे संकेत

View All
advertisement