पुण्यातील अल्पवयीन मुलीला पळवलं, 5 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा..., अखेर त्या इन्स्टा स्टोरीमुळे सापडला आरोपी
- Reported by:Pooja Satyavan Patil
- local18
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
22 वर्षीय तरुणाने पुण्यातील अल्पवयीन मुलीला पळवलं. 5 महिन्यापासून पोलिसांना गुंगारा दिला. परंतु इंस्टाग्रामची ती एक पोस्ट ठरली गेमचेंजर...
पुणे: पुणे जिल्ह्यातील अवघ्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या वर्षी 28 सप्टेंबरला ही मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.त्यानंतर गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून पोलीस मुलीचा कसून शोध घेत होते. अनेक ठिकाणी तपास करूनही ठोस माहिती मिळत नव्हती. मात्र, सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम स्टोरीच्या मधमातून पोलिसांना महत्त्वाचा धागा हाती लागला. या क्लूच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत आरोपीला अटक केली आहे.
5 महिन्यापासून आरोपीचा पोलिसांना गुंगारा
इन्स्टाग्राम स्टोरीमधून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून बेपत्ता असलेल्या 15 वर्षीय मुलीचा शोध लावला. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर वर्धा, गोंदिया आणि नागपूर ग्रामीण भागातही पोलिसांनी तिचा शोध घेतला, पण सुरुवातीला ठोस माहिती मिळाली नव्हती. आरोपी मयूर रमेश वघरे इंस्टाग्रामचा वापर करत होता आणि या सोशल मीडिया माध्यमामुळे पोलिसांना त्याचा शोध घेण्यात यश आले. या कारवाईत वाठोडा पोलीस ठाण्याच्या पथकाने मयूरला अटक केली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील म्हसगाव येथील रहिवासी आहे.
advertisement
इंस्टाग्रामची ती एक पोस्ट अन् ...
आरोपीने तीन दिवसांपूर्वी आपल्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली होती. यावरून पोलिसांना त्याचा मागोवा घेता आला आणि आरोपीच्या मित्राशी संपर्क साधला. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी एक सापळा रचला. या कारवाईसाठी पोलिसांचे पथक पुण्यातही रवाना झाले होते. पोलिसांनी एका महिला कर्मचाऱ्याला आरोपीच्या मित्राच्या मैत्रिणीची भूमिका निभावण्यासाठी सांगितले. त्यानंतर आरोपीला पुणे बसस्थानकावर 12 तास वाट पाहायला लावले. त्यानंतर बारामती येथे येण्यास सांगितले, जिथे तो 6 तास थांबला. अखेरीस भवानीनगर बस स्टॉप, इंदापूर येथे आरोपीला बोलावले. इंस्टाग्रामवर व्हिडिओ कॉल करून खात्री केल्यानंतर पोलिसांनी त्याला तिथे अटक केली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 9:46 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातील अल्पवयीन मुलीला पळवलं, 5 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा..., अखेर त्या इन्स्टा स्टोरीमुळे सापडला आरोपी











