Shocking Crime : मामे भावाने घरातच रचला कट, लिंबू सरबत ठरले कारण; संभाजीनगरच्या घटनेने सर्वत्र खळबळ
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- local18
- Published by:Tanvi
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar Crime : वैजापूर तालुक्यात नात्यातीलच व्यक्तीने विवाहित महिलेला गुंगीचे औषध देऊन आक्षेपार्ह छायाचित्रे काढत धमकीच्या जोरावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिस तपास सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर : नात्यातीलच व्यक्तीने तीस वर्षीय विवाहित महिलेवर गुंगीचे औषध देत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार वैजापूर तालुक्यात उघडकीस आला आहे. आरोपीने पीडितेची आक्षेपार्ह छायाचित्रे काढून ती पती आणि नातेवाईकांना दाखविण्याची धमकी देत वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वैजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवगाव येथील पीडित महिलेचे सन 2011 मध्ये लग्न झाले असून तिला दोन अपत्ये आहेत. तिच्या चुलतमामाचा मुलगा हा नातलग विविध कौटुंबिक कार्यक्रमांच्या निमित्ताने तिच्या घरी येत असे. सन 2020 नंतर त्याचे तिच्या घरी येणे-जाणे वाढले आणि पुढे दोघांमध्ये मोबाईलवर संभाषण सुरू झाले.
एका दिवशी पीडितेच्या घरी कोणीही नसताना आरोपी तेथे आला. त्याने तिला लिंबू सरबत बनविण्यास सांगितले. पीडितेने सरबत करून दिल्यानंतर, पाणी आणण्यासाठी ती घरात गेली असता आरोपीने तिच्या सरबतमध्ये गुंगीचे औषध टाकले. ते सरबत पिताच महिला बेशुद्ध झाली. या अवस्थेत आरोपीने तिची आक्षेपार्ह छायाचित्रे काढल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
advertisement
चार दिवसांनंतर आरोपी पुन्हा तिच्या घरी आला. त्याने काढलेली छायाचित्रे दाखवत ती पती, सासू आणी इतर नातेवाईकांना पाठविण्याची धमकी दिली. घाबरलेल्या महिलेने त्याला ''तुला काय हवे आहे?'' असे विचारले असता, आरोपीने तिला बाहेर जाण्याचा दबाव टाकला. त्यानंतर त्याने तिला म्हैसमाळ येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पुढील काळात वेगवेगळ्या लॉजवर नेऊन अशीच धमकी देत त्याने वारंवार शोषण केल्याचा आरोप आहे. याचबरोबर छायाचित्रे उघड करण्याची भीती दाखवून आरोपीने पीडितेकडून पैसेही उकळल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
advertisement
या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने संपूर्ण प्रकार आपल्या काकांना आणि इतर नातेवाईकांना सांगितला. त्यांनी आरोपीला समज देण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याच्या वर्तनात कोणताही बदल न झाल्याने पीडितेने वैजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 9:32 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Shocking Crime : मामे भावाने घरातच रचला कट, लिंबू सरबत ठरले कारण; संभाजीनगरच्या घटनेने सर्वत्र खळबळ










