Animal ने रचला नवा विक्रम; दहाव्या दिवशी छप्परतोड कमाई करत पार केला इतक्या कोटींचा टप्पा
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
'अॅनिमल'ने अवघ्या दहा दिवसांत सनी देओलच्या 'गदर 2' मागे टाकलं आहे. या चित्रपटाने दुसऱ्या रविवारी म्हणजेच 10 डिसेंबर रोजी देशभरात 400 कोटींचा टप्पा पार केला.
मुंबई, 11 डिसेंबर : संदीप रेड्डी वंगा यांचा 'अॅनिमल' ची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरूच आहे. हा चित्रपटाचं कलेक्शन थांबण्याचं कुठलंही चिन्हं दिसत नाहीये. 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत भरघोस कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. आता त्याने जगभरातील कलेक्शनच्या बाबतीत 'गदर 2' ला मागे टाकले आहे. 'अॅनिमल'ने अवघ्या दहा दिवसांत सनी देओलच्या 'गदर 2' मागे टाकलं आहे. या चित्रपटाने दुसऱ्या रविवारी म्हणजेच 10 डिसेंबर रोजी देशभरात 400 कोटींचा टप्पा पार केला. तसेच जगभरात 700 कोटींहून अधिक कमाई केली. 10 व्या दिवशी, 'Animal' ने देशभरात तब्बल 36 कोटी रुपयांची कमाई केली.
'अॅनिमल' च्या एवढ्या यशाने संदीप रेड्डी वंगा यांच्या नावाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. त्याचे आतापर्यंत फक्त तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत आणि तिन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत. 'अर्जुन रेड्डी' आणि 'कबीर सिंग' नंतर 'अॅनिमल' हा त्याचा तिसरा ब्लॉकबस्टर आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, दररोज प्रचंड कमाई करणाऱ्या 'Animal' ने 10 डिसेंबर म्हणजेच दुसऱ्या रविवारी सुमारे 36 कोटी रुपये कमावले आहेत. अशा प्रकारे चित्रपटाने 400 कोटींचा टप्पा पार केला.
advertisement
'मला नीट लिहिता-वाचता...' लहानपणापासून या गंभीर आजाराशी झुंज देतोय सनी देओल; केला धक्कादायक खुलासा
या चित्रपटाने आतापर्यंत 431.27 कोटींची कमाई केली आहे. यामध्ये या चित्रपटाने हिंदीतून सर्वाधिक म्हणजे 388.37 कोटी कमाई केली आहे. आतापर्यंत तेलगू भाषेतून 38.8 कोटी रुपये, तामिळमधून 3.43 कोटी रुपये, कन्नड भाषेतून 56 लाख रुपये आणि मल्याळम भाषेतून 12 लाख रुपये जमा झाले आहेत. आता देशभरातील 'अॅनिमल'चे एकूण कलेक्शन 513.75 कोटींवर पोहोचले आहे.
advertisement
अर्थात, एक मोठा वर्ग 'अॅनिमल'वर बरीच टीका करत आहे, पण याच वादाचा चित्रपटाला फायदाच होताना दिसत आहे. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यातही 'अॅनिमल' च्या कमाईत घसरण न होता वाढच झाली आहे.
'Animal' च्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, 'Animal' ने 9 दिवसात 660 कोटी रुपयांचे कमाई केली होती आणि आता 10 व्या दिवशी चित्रपटाने 717 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'गदर 2' ने जगभरात पूर्ण कलेक्शन 686 कोटी रुपये झालं होतं. अशाप्रकारे 'अॅनिमल' ने दहाव्या दिवशीच गदर 2'चा मागे टाकलं आहे. 'अॅनिमल'मध्ये रणबीरशिवाय बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, तृप्ती डिमरी, सुरेश ओबेरॉय आणि प्रेम चोप्रा यांच्या भूमिका आहेत. अॅनिमल' च बजेट 100 कोटी रुपये आहे. त्यामुळे चित्रपट आता सुपरहिट झाल्याचं बोललं जातंय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 11, 2023 10:36 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Animal ने रचला नवा विक्रम; दहाव्या दिवशी छप्परतोड कमाई करत पार केला इतक्या कोटींचा टप्पा