सिनेसृष्टी हादरली! दिग्दर्शकाचं अपहरण अन् बेदम मारहाण; ऐश्वर्यासह 11 जणांना बेड्या, नेमकं प्रकरण काय?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
एका चित्रपट दिग्दर्शकाचे अपहरण करून त्याला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी एका अभिनेत्रीला तिच्या ११ साथीदारांसह अटक करण्यात आली आहे.
बेंगळुरू : बंगळुरूमधून एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्याने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. पैशांच्या वादातून एका दिग्दर्शकाचे अपहरण करून त्याला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी एका अभिनेत्रीला तिच्या ११ साथीदारांसह अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे सिनेसृष्टीतील कलाकारांचा गुन्हेगारीशी असलेला संबंध पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
या प्रकरणातील पीडित व्यक्ती तामिळनाडूचे रहिवासी असलेले दिग्दर्शक अनीश आहेत. अनीश हे सध्या 'जीवदा भाषे' नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात लक्ष्मी नारायण नावाच्या व्यक्तीने सुमारे ५ ते ६ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. याच पैशांवरून अनीश आणि गुंतवणूकदारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून खटके उडत होते. मात्र, या वादाचा अंत इतक्या भयानक पद्धतीने होईल, याची कल्पनाही कोणी केली नव्हती.
advertisement
कार विकण्याच्या बहाण्याने रचला सापळा
अनीश आपली 'होंडा सीआरव्ही' कार विकण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी अभिनेत्री ऐश्वर्याशी संपर्क साधला. ऐश्वर्याने त्यांची ओळख शाहिद नावाच्या एका खरेदीदाराशी करून दिली. ९ फेब्रुवारीच्या संध्याकाळी अनीश मुंबईहून बंगळुरूला पोहोचले. तिथे ऐश्वर्या, शाहिद आणि त्यांच्या साथीदारांनी अनीश यांना गाठले. गाडीच्या तपासणीच्या बहाण्याने शाहिद अनीश यांना एका निर्जन फ्लॅटवर घेऊन गेला.
advertisement
अनीश यांनी जसे त्या फ्लॅटमध्ये पाऊल ठेवले, तसा मागून दरवाजा बंद झाला. आत आधीच दबा धरून बसलेल्या आशीर्वाद आणि त्याच्या टोळीने क्रिकेटचे विकेट्स आणि हॉकी स्टिकने अनीश यांच्यावर हल्ला चढवला.
व्हिडिओ कॉलवर दिला मारहाणीचा आदेश
advertisement
या घटनेत धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा अनीश यांना मारहाण केली जात होती, तेव्हा मुख्य गुंतवणूकदार लक्ष्मी नारायण हा व्हिडिओ कॉलवर सर्व काही लाईव्ह पाहत होता. "याला अजून मारा!" असा आदेश तो आशीर्वादला देत होता, असा खळबळजनक आरोप अनीश यांनी केला आहे. हल्लेखोरांनी अनीश यांच्याकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि एटीएम कार्ड वापरून पैसेही काढून घेतले.
advertisement
रुग्णालयाबाहेर सोडून पळ काढला
मारहाणीमुळे अनीश यांच्या नाकातून आणि शरीरातून प्रचंड रक्तस्त्राव होत होता. गंभीर अवस्थेत असलेल्या अनीश यांनी जीवाची भीक मागितल्यानंतर, आरोपींनी त्यांना संजय गांधी रुग्णालयाबाहेर फेकून दिले आणि तिथून पळ काढला. अनीश यांनी तात्काळ अडुगोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
बंगळुरू पोलिसांनी याप्रकरणी वेगाने चक्र फिरवत अभिनेत्री ऐश्वर्यासह सर्व ११ आरोपींना अटक केली आहे. या कटात कोणाची काय भूमिका होती आणि मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. जखमी अनीश यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 26, 2026 5:42 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
सिनेसृष्टी हादरली! दिग्दर्शकाचं अपहरण अन् बेदम मारहाण; ऐश्वर्यासह 11 जणांना बेड्या, नेमकं प्रकरण काय?









