advertisement

Bhau Kadam : बाई काय प्रकार! भाऊ कदमच्या लेकीचं लग्न? इतकं प्रायव्हेट की तिलाच नाही बोलावलं, VIDEO

Last Updated:

Bhau Kadam Daughter : अभिनेते भाऊ कदम यांची मुलगी मृण्मयी कदम हिनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये माझ्याच लग्नात मला बोलावलं नाही असं ती म्हणतेय.

News18
News18
मराठी मनोरंजन विश्वात सध्या लगीन सराई सुरू आहे. अभिनेत्री रूमानी खरे, अभिनेत्री अपूर्वा गोरे आणि अंशुमन जोशी यांनी लग्नगाठ बांधली. दरम्यान प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्या मुलीच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. भाऊ कदम यांनी मुलीचं लग्न केलं पण त्या लग्नात तिलाच बोलावलं नाही! आता तुम्ही म्हणाला बाई हा काय प्रकार? भाऊ कदमच्या मुलीचं देखील असंच काही झालं. नेमका काय प्रकार आहे पाहूयात.
अभिनेते भाऊ कदम यांची मुलगी मृण्मयी कदम हिनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओ सध्या चर्चा होतेय. भाऊ कदम यांच्या मुलीचं लग्न झालं अशा आशयाची व्हायरल पोस्ट तिनं शेअर केली आहे. अफवा पसरवणाऱ्या या पोस्टवर तिनं तिच्या स्टाइलनं सडेतोड उत्तर दिलं आहे.
advertisement
'मृण्मयीच्या लग्नात भाऊ कदम झाले भावूक, संघर्षाचे दिवस आठवून उपस्थितांच्या डोळ्यातही आलं पाणी', असं लिहिलेली एक पोस्ट शेअर करत मृण्मयीनं व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये ती म्हणतेय, "तुम्ही मला इव्हाइटच केलं नाही माझ्या लग्नात. हे योग्य नाही. मला तरी कळलं पाहिजे की मी मॅरिड आहे आणि तेही मी अमेरिकेत असून मी मॅरिड आहे हे मला आता कळलं. प्लिज मला माझ्या लग्नात बोलवा."
advertisement
advertisement
मृण्मयीने तिचं लग्न झाल्याच्या बातमीवर अशी प्रतिक्रिया देत मजेशीर पद्धतीनं कानउघडणी केली आहे. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना आवडला असून त्यांनीही तिचं कमेंट करत अडवान्समध्ये अभिनंदन केलं आहे. एका युझरनं लिहिलंय, "लग्न खूपच प्रायव्हेट होतं वाटत म्हणून नवरी मुलीलापण नाही बोलावलं." दुसऱ्या युझरनं लिहिलंय, "जाऊ दे.. झालं आता लग्न, जा मुली जा दिल्या घरी तु सुखी रहा."
advertisement
भाऊ कदमची मुलगी शिक्षणासाठी अमेरिकत आहे. त्याचबरोबर ती युट्यूब व्लॉगही करते. कंटेट क्रिएटर म्हणूनही ती काम करतेय.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bhau Kadam : बाई काय प्रकार! भाऊ कदमच्या लेकीचं लग्न? इतकं प्रायव्हेट की तिलाच नाही बोलावलं, VIDEO
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement