'घरी गडबड होईल', बिग बींपण बायकोला घाबरतात; KBC17 च्या सेटवरही जया बच्चनची दहशत,VIDEO

Last Updated:

Amitabh Bachchan KBC 17 : बिग बी सध्या केबीसी 17मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. केबीसीच्या सेटवर त्यांनी आजवर अनेक किस्से सांगितले आहेत. बिग बी त्यांच्या बायकोलाही घाबरतात हेही केबीसीच्या सेटवर पहिल्यांदाच पाहायला मिळालंय.

News18
News18
मुंबई : बायकोला घाबरत नाही असा नवरा क्वचितच कुठे बघायला मिळतं. तुम्ही आम्ही काय बॉलिवूडचे महानायक बिग बींही त्यांच्या बायकोला घाबरतात. जया बच्चन या बिग बींच्या मागे खंबीरपणे उभ्या आहेत. दोघे एकमेकांचे चांगले मित्र मैत्रीण असले तरी बायकोच्या रुपात जया बच्चन उभ्या ठाकल्या की सामान्य नवऱ्यांसारखे बिग बी देखील त्यांना घाबरतात. याचा प्रत्यय नुकताच केबीसी 17च्या सेटवर पाहायला मिळालाय.
अमिताभ बच्चन यांचा 'कौन बनेगा करोडपती 17' हा क्विझ गेम शो सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये अनेक स्पर्धकांनी आधीच लाखो रुपये जिंकले आहेत. या आठवड्यात मंगळवारच्या भागात हरियाणाच्या आशा धिर्यान हॉट सीटवर बसल्या होत्या. त्यांनी 10 प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली. पण11 वा प्रश्न चुकला आणि त्यांना शोमधून बाहेर पडावं लागलं. दरम्यान चुकीचं उत्तर दिल्यानंतर बिग बींनी त्यांना जी प्रतिक्रिया दिली ती सध्या चर्चेत आली आहे.
advertisement
आशा धिर्यान यांनी  10 प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन आधीच 5 लाख रुपये जिंकले होते. केबीसी 17 च्या मंगळवारीच्या भागाची सुरुवात 11 व्या प्रश्नाने झाली. ज्याची किंमत 7 लाख 50 हजार रुपये आहे. आशा उत्तराबद्दल गोंधळल्या होत्या. असे वाटत होते की त्या लाईफलाईन वापरतील, परंतु त्यांनी तसं केलं नाही आणि चुकीचं उत्तर दिलं.
advertisement

11 वा प्रश्न काय होता?

बिग बी आशाला 11 वा प्रश्न वाचून दाखवतात:  ‘एक पेड़ मां के नाम’ उपक्रमाचा भाग म्हणून जुलै 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवमध्ये कोणते झाड लावले होते? पर्याय: अ. नारळ, ब. फणस, क. आंबा, ड. वड. आशा घाईघाईने ड. वडाचा पर्याय निवडते, बरोबर उत्तर क. आंबा आहे.
advertisement
advertisement
अमिताभ बच्चन आशा धिर्यानला सांगतात की तिने चुकीचे उत्तर दिले. तिने लोभाला बळी पडायला नको होते. तिच्याकडे दोन लाइफलाइन होत्या आणि त्यांनी त्यांचा वापर करायला हवा होता. आशा धिर्यान BKC 17मधून फक्त 5 लाख रुपये घेऊन गेल्या.

बिग बीसोबत चहा प्यायल्या 

केबीसी 17मध्ये आशा धिर्यानने अमिताभ बच्चनसोबत चहा घेण्याची इच्छा व्यक्त केली. बिग बीने लगेच शोमध्ये चहा मागवला आणि स्पर्धकांसोबत प्यायले. आशा धिर्याननी अमिताभ बच्चनला सांगितलं की, "तुम्ही ज्या कपातून चहा पीत आहात तो मला द्या. मी तो घरी शोकेसमध्ये ठेवेन." हे ऐकून बिग बी आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, "ए एसं कधीच करू नका, माझ्या घरी गडबड होईल." बिग बींचं हे वाक्य ऐकून केबीसीच्या सेटवरही जया बच्चन यांची दहशत आहे हे दिसून आलं आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
'घरी गडबड होईल', बिग बींपण बायकोला घाबरतात; KBC17 च्या सेटवरही जया बच्चनची दहशत,VIDEO
Next Article
advertisement
OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
    View All
    advertisement