Tejasswi Prakash: तेजस्वी प्रकाश 24 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत करणार रोमान्स, सीरीजमधले सीन्स पाहून भडकले प्रेक्षक
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
टेलिव्हिजन शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली तेजस्वी लवकरच ओटीटी डेब्यू करतेय. सध्या तेजस्वी तिच्या रोमान्समुळे चर्चेत आली आहे.
'बिग बॉस 15' ची विजेती तेजस्वी प्रकाश सध्या तिच्या आगामी सीरीजमुळे चर्चेत आली आहे. टेलिव्हिजन सीरियल आणि शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली तेजस्वी लवकरच ओटीटी डेब्यू करणार आहे. तेजस्वी लवकरच सीरीजमधून अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सायको सैंया' (Psycho Saiyaan) असं तिच्या सीरीजचं नाव आहे. टेलिव्हिजन सीरियलमध्ये ती तिच्यापेक्षा 24 वर्षे मोठ्या असलेल्या अभिनेत्यासोबत रोमान्स करणार आहे. सध्या तिच्या ह्या नव्या सीरीजची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश 'सायको सैंया' या सीरिजमधून प्रसिद्ध भोजपूरी अभिनेते रवी किशन यांच्यासोबत रोमान्स करणार आहेत. त्याच्या सीरीजमधला एक शॉर्ट सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. कायमच आपल्या दमदार अभिनयासाठी चर्चेत राहणारे रवी किशन सध्या आपल्यापेक्षा 24 वर्षे लहान असणाऱ्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करण्यामुळे चर्चेत आहेत. रवी किशन आणि तेजस्वी प्रकाश यांच्या 'सायको सैंया' सीरीजमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांची मने जिंकणार, हे नक्की.
advertisement
सध्या सोशल मीडियावर रवी आणि तेजस्वीच्या सीनची जोरदार चर्चा सुरू आहे. त्या सीनमध्ये, रवी किशन तेजस्वीसोबत रोमान्स करताना दिसत आहे. तेजस्वीला पडद्यावर पहिल्यांदाच इंटिमेट सीन करताना चाहते पाहत आहेत. आतापर्यंत टेलिव्हिजन सीरियलच्या माध्यमातून संस्कारी सूनेच्या किंवा नागिनच्या भूमिकेतूनच प्रेक्षकांना दिसली आहे. पण आता, "सायको सैंया" मध्ये तिने एक धाडसी भूमिका साकारली असून तिने तिच्या आदर्श सूनची इमेज मोडित काढली आहे. सध्या सोशल मीडियावर तेजस्वीच्या अभिनयाची जोरदार चर्चा होते.
advertisement
दरम्यान, तेजस्वीनीचा इंटिमेट सीन पाहिल्यानंतर चाहते तिला ट्रोल करत असून काहींनी तिच्या अपकमिंग प्रोजेक्टचे कौतुकही केले आहे. "सायको सैंया" वेबसीरीजबद्दल बोलायचे तर, ही वेबसीरीज 25 फेब्रुवारी 2026 रोजी Amazon MX Player या ओटीटी ॲपवर रिलीज झाली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 03, 2026 6:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Tejasswi Prakash: तेजस्वी प्रकाश 24 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत करणार रोमान्स, सीरीजमधले सीन्स पाहून भडकले प्रेक्षक








