'ती लेस्बियन आहे...', कुनिका सदानंदचं क्रिकेटरच्या बहिणीबद्दल मोठं स्टेटमेन्ट

Last Updated:

Bigg Boss 19 : मालती चहरबद्दल केलेल्या विधानामुळे कुनिका सदानंद सध्या प्रचंड ट्रोल होत आहे. एका विधानामुळे ती ट्रोल्सच्या निशाण्यावर आली आहे.

News18
News18
Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. आता आता कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला आहे. नुकत्याच आलेल्या एका एपिसोडमध्ये कुनिका सदानंदने मालती चहरबद्दल मोठा दावा केला आहे. त्यामुळे कुनिका सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. दरम्यान तान्याने सांगितले की मालतीने तिला प्लेटने मारण्याचा प्रयत्न केला. एकीकडे तान्या आपल्या रागाबद्दल बोलत असताना कुनिकाने असा दावा केला की, मालकी लेस्बियन असल्याची तिला शंका आहे. कुनिकाच्या या स्टेटमेंटने मालती चहरचे चाहते दुखावले आहेत. त्यांनी कुनिकाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
मालतीबद्दल कुनिका काय म्हणाली?
तान्या मित्तल सोबत बोलत असताना कुनिका म्हणाली,"एक गोष्ट बोलायचं आहे. मालती मॅडम आहेत ना, मला पूर्ण विश्वास आहे की ती लेस्बियन आहे". मालतीच्या या विधानावर तान्याचा मात्र काही प्रतिसाद मिळाला नाही. पण कुनिका यावर सातत्याने बोलत राहिली. कुनिका म्हणाली,"तिचे हावभावही काहीसे तसेच दिसतात आणि ज्या प्रकारे ती बोलते, त्याकडे लक्ष द्या". तिच्या या दाव्यामुळे आता कुनिका सदानंद जोरदार ट्रोल होत आहे.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by VIBE MAFIA (@vibemafiaa)



advertisement
कुनिकावर नेटकरी भडकले
कुनिका सदानंद आपल्या या वक्तव्यामुळे ट्रोल्सच्या निशाण्यावर आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे,"नॅशनल टीव्हीवर कोणाच्या सेक्सुअॅलिटीबद्दल प्रश्न विचारणे चुकीचे आहे. कुनिकाला लाज वाटायला हवी.". दुसऱ्याने लिहिले,"आता वीकेंडला तिला कळेल की काय बोलत आहे". तर दुसरीकडे तान्याचे चाहते मात्र या सगळ्यापासून दूर राहिल्यामुळे तिचं कौतुक करत आहेत.
advertisement
रोहित शेट्टी घेणार शाळा
'बिग बॉस 19'च्या आगामी वीकेंड का वार'मध्ये या आठवड्यात सलमान नव्हे तर रोहित शेट्टी स्पर्धकांची शाळा घेताना दिसून येईल. नुकताच वीकेंडचा वारचा प्रोमो आऊट झाला आहे. यात रोहित शेट्टी 'बिग बॉस 19'चा एपिसोड होस्ट करताना दिसत आहे. या आठवड्यात तो बिग बॉसला बायस्ट म्हणून संबोधल्याबद्दल अमाल मलिक आणि शहबाज बदेशाची शाळा घेताना दिसेल.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'ती लेस्बियन आहे...', कुनिका सदानंदचं क्रिकेटरच्या बहिणीबद्दल मोठं स्टेटमेन्ट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement