बिग बॉसच्या घरातील वाद थेट कोर्टात, अमाल मलिकच्या अडचणी वाढल्या, सहस्पर्धकाच्या कुटुंबाची पोलिसात धाव

Last Updated:

Bigg Boss 19 : 'बिग बॉस १९' मध्ये सध्या स्पर्धक म्हणून असलेल्या फरहाना भट्ट आणि गायक-संगीतकार अमाल मलिक यांच्यातील वादाने आता कायदेशीर वळण घेतले आहे.

News18
News18
मुंबई : 'बिग बॉस १९' मध्ये सध्या स्पर्धक म्हणून असलेल्या फरहाना भट्ट आणि गायक-संगीतकार अमाल मलिक यांच्यातील वादाने आता कायदेशीर वळण घेतले आहे. अमाल मलिकची मावशी रोशन गॅरी भिंडर यांनी एका मुलाखतीत फरहाना भट्टबद्दल केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे फरहानाच्या कुटुंबाने थेट कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

अमाल मलिक हा सध्या 'बिग बॉस १९' च्या घरात आहे. याचदरम्यान, त्यांच्या कुटुंबातील सदस्य रोशन गॅरी भिंडर यांनी एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. रोशन भिंडर यांनी फरहाना भट्टबद्दल कथितरीत्या सांप्रदायिक तेढ निर्माण करणारी टिप्पणी केली. व्हिडिओ क्लिपमध्ये भिंडर यांनी फरहानाला आतंकवादी म्हटले असल्याचा आरोप आहे. फरहाना भट्ट, जी राष्ट्रीय स्तरावरील तायक्वांदो ॲथलीट देखील आहे, तिच्या कुटुंबाने या अपमानकारक आणि द्वेषपूर्ण विधानाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.
advertisement

१ कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी

फरहाना भट्टला दहशतवादी म्हणणाऱ्या बदनामीकारक आणि निराधार आरोपांसह खोटी आणि द्वेषपूर्ण विधाने प्रकाशित आणि प्रसारित केल्याबद्दल श्रीमती रोशन गॅरी भिंदर, FIFAFuz युट्यूब चॅनल आणि युट्यूब इंडिया यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
advertisement
फरहाना भट्टच्या टीमने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर एक प्रेस नोट जारी करून कायदेशीर कारवाई सुरू केल्याची माहिती दिली. या नोटीसमध्ये कुटुंबाने प्रतिष्ठा आणि भावनिक नुकसानीसाठी १ कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केली आहे. यासोबतच, वादग्रस्त व्हिडिओ त्वरित हटवावा आणि सार्वजनिकरीत्या माफी मागावी, असेही म्हटले आहे.

महिला आयोगाकडेही धाव

फरहाना भट्ट यांच्या कुटुंबाने या वादाला ऑनलाइन बदनामीचा दर्जा न देता, कायदेशीर मार्गाने उत्तर देण्याचा पर्याय निवडला आहे. या कायदेशीर नोटीसची प्रत राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगालाही योग्य कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे.
advertisement
फरहानाच्या कुटुंबाने जनतेला आणि प्रसारमाध्यमांना आवाहन केले आहे की, त्यांनी द्वेष पसरवणारा कंटेंट शेअर करू नये आणि सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेचा आदर करावा. या संपूर्ण वादावर अमाल मलिक यांच्या कुटुंबाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
बिग बॉसच्या घरातील वाद थेट कोर्टात, अमाल मलिकच्या अडचणी वाढल्या, सहस्पर्धकाच्या कुटुंबाची पोलिसात धाव
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement