साखरपुडा, हळद, लग्न... 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने बांधली साताजन्माची गाठ, आलिशान लग्नातील VIDEO VIRAL

Last Updated:

Jay Dudhane Married: मेघन-अनुष्का, सोहम-पूजा आणि सूरज चव्हाण यांच्यानंतर आता 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता जय दुधाणे यानेही आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे.

News18
News18
मुंबई: मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईचा असा काही धुराळा उडाला आहे की, दर दोन दिवसांनी एका सेलिब्रिटीच्या लग्नाची बातमी कानावर पडतेय. मेघन-अनुष्का, सोहम-पूजा आणि सूरज चव्हाण यांच्यानंतर आता 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता जय दुधाणे यानेही आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे. आज, २४ डिसेंबर २०२५ रोजी जय आणि त्याची प्रेयसी हर्षला पाटील यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
गेल्या काही दिवसांपासून जयच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. 'स्प्लिट्सविला' आणि 'बिग बॉस मराठी'मध्ये आपल्या डॅशिंग स्वभावाने गाजलेला जय खऱ्या आयुष्यात कधी बोहल्यावर चढणार, याची चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर आज त्यानं हर्षलाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. या लग्नाचे पहिले फोटो समोर आले असून, या जोडप्याच्या साध्या पण पारंपरिक लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
advertisement

थाटात पार पडलं जय-हर्षलाचं लग्न

लग्नासाठी या दोघांनीही पारंपरिक मराठमोळ्या पेहरावाला पसंती दिली होती. जयने पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान केलं होतं. डोक्यावर मुंडावळ्या आणि कपाळावर टिळा लावलेला जय अतिशय राजबिंडा दिसत होता. जयची पत्नी हर्षला हिने पिवळ्या रंगाची सहावारी साडी आणि त्यावर गुलाबी रंगाचा भरजरी शेला परिधान केला होता. नाकात नथ आणि पारंपरिक दागिन्यांमध्ये हर्षलाचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं.
advertisement
advertisement

कोण आहे जयची अर्धांगिनी?

जयची पत्नी हर्षला पाटील ही केवळ त्याची मैत्रीण नसून ती स्वतः एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो चाहते असून ती फॅशन आणि ट्रॅव्हल ब्लॉगिंगसाठी ओळखली जाते. जय आणि हर्षला गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. यावर्षी मार्च महिन्यात जयने चक्क गुडघ्यावर बसून हर्षलाला प्रपोज केलं होतं, ज्याचे फोटो त्यावेळी तुफान व्हायरल झाले होते.
advertisement

दिग्गजांची हजेरी अन् शुभेच्छांचा वर्षाव

या विवाहसोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक बड्या कलाकारांनी हजेरी लावली होती. 'बिग बॉस'मधील त्याचे जुने मित्र आणि सहकलाकार या लग्नात नाचताना दिसले. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीही जयच्या लग्नाला हजेरी लावली होती.
advertisement
advertisement
सोशल मीडियावर सध्या जय-हर्षलाच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडतोय. "दोघांची जोडी एकदम कडक!", "नजर न लागो", अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
साखरपुडा, हळद, लग्न... 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने बांधली साताजन्माची गाठ, आलिशान लग्नातील VIDEO VIRAL
Next Article
advertisement
CM Devendra Fadnavis On Thackeray Alliance:  ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी शाल...'
ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श
  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

View All
advertisement