आधी प्रायव्हेट फोटो लीक, आता अमेरिकेत बंगला! बॉलिवूड अभिनेत्रीला जेलमधून कोणी पाठवले महागडे गिफ्ट्स?

Last Updated:
Sukesh Chandrasekhar-Jacqueline Fernandez: ख्रिसमस हा सण सुकेशसाठी जॅकलिन फर्नांडिसवर आपलं प्रेम उधळण्याचं निमित्त ठरलंय. त्याने पुन्हा एकदा जॅकलिनसाठी जेलमधून एक भावूक पत्र धाडलंय, ज्यातील दावे ऐकून तपास यंत्रणांनाही शॉक बसला आहे.
1/8
दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत, मंडोली जेलच्या काळोख्या कोठडीत बसलेला महाठग सुकेश चंद्रशेखर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. निमित्त आहे ख्रिसमसचं! ख्रिसमस हा सण सुकेशसाठी मात्र हे जॅकलिन फर्नांडिसवर आपलं प्रेम उधळण्याचं निमित्त ठरलंय. त्याने पुन्हा एकदा जॅकलिनसाठी जेलमधून एक भावूक पत्र धाडलंय, ज्यातील दावे ऐकून तपास यंत्रणांनाही शॉक बसला आहे.
दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत, मंडोली जेलच्या काळोख्या कोठडीत बसलेला महाठग सुकेश चंद्रशेखर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. निमित्त आहे ख्रिसमसचं! ख्रिसमस हा सण सुकेशसाठी मात्र जॅकलिन फर्नांडिसवर आपलं प्रेम उधळण्याचं निमित्त ठरलंय. त्याने पुन्हा एकदा जॅकलिनसाठी जेलमधून एक भावूक पत्र धाडलंय, ज्यातील दावे ऐकून तपास यंत्रणांनाही शॉक बसला आहे.
advertisement
2/8
सुकेशने आपल्या पत्रात जॅकलिनला ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना एक खळबळजनक खुलासा केला आहे. त्याने दावा केलाय की, अमेरिकेतील अतिशय पॉश आणि श्रीमंतांची वस्ती असलेल्या बेवर्ली हिल्समध्ये त्याने जॅकलिनसाठी एक आलिशान घर खरेदी केलं आहे. या घराला त्याने 'लव्ह नेस्ट' असं रोमँटिक नाव दिलं असून, हे घर त्यांच्या भविष्यातील स्वप्नांचा एक भाग असल्याचं त्याने म्हटलंय.

3/8
२०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जेलमध्ये शिक्षा भोगत असतानाही, सुकेशची स्वप्नं मात्र सातासमुद्रापार फिरत आहेत, हे पाहून आश्चर्य व्यक्त केलं जातंय. सुकेशचं पत्र म्हणजे जणू एखाद्या बॉलिवूड सिनेमाची स्क्रिप्टच वाटते. पत्रात त्याने जॅकलिनचा उल्लेख नेहमीप्रमाणेच 'बोम्मा' आणि 'बेबी गर्ल' असा केला आहे.

4/8
 सुकेशने आपल्या पत्रात जॅकलीनला 'बेबी' आणि 'बोम्मा' असं म्हणत लिहिलंय, "बेबी, आजच्या या दिवशी मी तुला 'लव्ह नेस्ट' भेट देत आहे. अमेरिकेतील बेवर्ली हिल्समध्ये आपलं हक्काचं घर तयार झालंय. तुला वाटलं होतं की हे काम पूर्ण होणार नाही, पण मी ते करून दाखवलं. विशेष म्हणजे, या घराच्या भोवती आपला स्वतःचा १९ होल्सचा प्रायव्हेट गोल्फ कोर्स असेल!"

5/8
 बंगल्यावरच न थांबता सुकेशने आता क्रिकेटच्या मैदानातही उडी मारण्याचे संकेत दिले आहेत. त्याने पत्रात दावा केला आहे की, तो आयपीएलमधील RCB ही टीम विकत घेण्याच्या प्रयत्नात आहे. "मी आरसीबीसाठी बोली लावली आहे. देवाच्या कृपेने लवकरच ही टीम आपली असेल आणि आपण एकत्र मॅचेस पाहू," असंही त्याने या पत्रात म्हटलं आहे. जेलमध्ये राहून आयपीएल टीम विकत घेण्याचे त्याचे हे दावे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

6/8
सुकेशचं हे पत्र जॅकलिनसाठी मात्र डोकेदुखी ठरू शकतं. यामागे काही प्रमुख कारणं सांगितली जात आहेत. कायदेतज्ज्ञांच्या मते, सुकेश स्वतःला एक वेडा प्रेमी म्हणून स्वतःला जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. जेणेकरून तो हे सिद्ध करू शकेल की जॅकलिनला दिलेले गिफ्ट्स हे केवळ प्रेमाचा भाग होते, गुन्ह्यातील पैशांची गुंतवणूक नव्हती.

7/8
आधीच ईडीच्या रडारवर असलेल्या जॅकलिनसाठी हे नवे दावे संकट ठरू शकतात. जर अमेरिकेतील या मालमत्तेचा संबंध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील पैशांशी निघाला, तर अभिनेत्रीची चौकशी पुन्हा होऊ शकते.

8/8
सुकेशला हे चांगलंच ठाऊक आहे की, जोपर्यंत जॅकलिनचं नाव त्याच्याशी जोडलं जातंय, तोपर्यंत तो नॅशनल हेडलाईन्समध्ये राहणार. जेलमध्ये राहूनही प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची त्याची ही खेळी म्हणता येऊ शकते.

CM Devendra Fadnavis On Thackeray Alliance:  ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी शाल...'
ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श
  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

View All
advertisement