'ज्याला बोलण्याचं भान नाही, त्याला इथे स्थान...' निक्की तांबोळीला रितेश भाऊंचा जोरदार धक्का

Last Updated:

या घरात 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा पहिला आठवडा निक्की तांबोळीने चांगलाच गाजवला. 'बिग बॉस मराठी'च्या घराला कंट्रोल करताना निक्की दिसून आली.

बिग बॉस मराठी
बिग बॉस मराठी
मुंबई : "बिग बॉस मराठी'च्या नव्या सिझनला सुरुवात झाली असून वेगवेगळ्या क्षेत्रातील स्पर्धक घरात आपलं स्थान मिळवण्यासाठी लढत आहेत. या घरात 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा पहिला आठवडा निक्की तांबोळीने चांगलाच गाजवला. 'बिग बॉस मराठी'च्या घराला कंट्रोल करताना निक्की दिसून आली. आपल्या हिंमतीने आणि डोक्याने तिने अनेक गोष्टी केल्या. पण मुद्दा बरोबर असला तरी तिची भाषा चुकीची होती. त्यामुळे रितेश भाऊ त्याच्या 'भाऊच्या धक्क्या'वर तिचा माज उतरवणार आहे.
आतापर्यंत महेश मांजरेकर यांनी होस्ट केलेल्या सीझनमध्ये दर आठवड्याला चावडी असायची, ज्यात मांजरेकर स्पर्धकांची शाळा घ्यायचे. पण आता हा सीझन रितेश देशमुख होस्ट करणार आहे. यंदा चावडी नाही तर भाऊच्या धक्क्यावर रितेश सगळ्यांची शाळा घेणार आहे. आज पहिल्यांदाच बिग बॉसच्या या सीझनचा भाऊचा धक्का रंगणार आहे.
advertisement
सुपरस्टार रितेश देशमुखने 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील पहिल्याच 'भाऊच्या धक्क्यावर' निक्की तांबोळीसह इतर सदस्यांची शाळा घेताना दिसून येणार आहे. पहिल्याच आठवड्यात काहींच्या तोडंचं पाणी पळालं तर काहींच्या काळजाचं पाणीपाणी झालं. रितेशच्या या 'भाऊच्या धक्क्या'वर घरातील उद्धट सदस्यांचा पाणउतारा केला जाणार आहे.
निक्की तांबोळी 'बिग बॉस मराठी'च्या घरात अभिनेत्री वर्षा उसगांवकरांचा अनादर करताना दिसून आली. त्यामुळे रितेश भाऊ निक्कीची चांगलीच शाळा घेणार आहे. रितेश देशमुख निक्कीला म्हणाला,"वर्षां ताईंसोबत ज्या भाषेत तुम्ही बोलता ती भाषा मी खपवून घेणार नाही.. त्यांचं कतृत्व, काम याचा रिस्पेक्ट झालाच पाहिजे. तुमचा उद्धटपणा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला आहे. कारण तुम्ही थेट मराठी माणसाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन त्या मराठी माणसाचा अपमान केलाय."
advertisement
advertisement
रितेश पुढे म्हणाला,"'बिग बॉस मराठी'च्या घरात ज्याला बोलायचं भान नाही..त्याला इथे स्थान नाही. महाराष्ट्र ठरवणार कोण घरात आणि कोण घराबाहेर जाणार? 'बिग बॉस मराठी'च्या ट्रॉफीवर तुमचं नाव कोरलं जाणार की नाही हेदेखील मराठी माणसंचं ठरवणार". असं म्हणत रितेशने निक्की तांबोळीला सुनावलं आहे.
रितेश देशमुख निक्कीची शाळा घेताना पाहून प्रेक्षकांना आनंद झाला आहे. निक्कीला तिच्या वागण्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जात होतं. आता रितेशने तिला सुनावलेलं पाहून प्रेक्षकांना आनंद झाला आहे. नेटकऱ्यांनी हे पाहून 'हेच बघायचं होतं अख्ख्या महाराष्ट्राला ...', 'आता सगळ्यांचा माज उतरणार.', 'Ritesh sir नी सिद्ध केलं की मराठी माणसानं बदल वाईट बोलेल सहन केलं जाणार नाही' असं म्हटलं आहे.
advertisement
‘BIGG BOSS मराठी’ तुम्ही दररोज रात्री 9 वा कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर पाहू शकता.
मराठी बातम्या/मनोरंजन/
'ज्याला बोलण्याचं भान नाही, त्याला इथे स्थान...' निक्की तांबोळीला रितेश भाऊंचा जोरदार धक्का
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement