'सगळं स्क्रिप्टेड असतं, सगळे ऑटोट्यून...' बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिकेनं केली इंडस्ट्रीची पोलखोल

Last Updated:

सुनिधीने इंडस्ट्रीतील अनेक प्रतिभावान गायकांसोबत काम केलं आहे. नुकतंच सुनिधीने एक मुलाखत दिली ज्यात तिने संगीत विश्वाबद्दल अनेक खुलासे केले आहेत. एवढंच नाही तर तिनी रिऍलिटी शोविषयी केलेले खुलासे ऐकून सगळेच शॉक झाले आहेत.

सुनिधी
सुनिधी
मुंबई : 'कमली' आणि 'क्रेझी किया रे' पासून 'सामी-सामी' पर्यंत 2000 हून अधिक गाण्यांना आवाज देणारी गायिका म्हणजे सुनिधी चौहान. सुनिधी हिंदी संगीत उद्योगातील सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून ओळखली जाते. सुनिधीने इंडस्ट्रीतील अनेक प्रतिभावान गायकांसोबत काम केलं आहे. नुकतंच सुनिधीने एक मुलाखत दिली ज्यात तिने संगीत विश्वाबद्दल अनेक खुलासे केले आहेत. एवढंच नाही तर तिनी रिऍलिटी शोविषयी केलेले खुलासे ऐकून सगळेच शॉक झाले आहेत.
सुनिधी चौहान म्युझिक इंडस्ट्रीतील टॉप गायकांपैकी एक आहे, जिने इंडस्ट्रीला एक-दोन नव्हे तर अनेक हिट गाणी दिली आहेत. तिने अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत आणि अनेक रिॲलिटी शोमध्ये ती जज म्हणूनही दिसली आहे. आता सुनिधी चौहानने या सिंगिंग रिॲलिटी शोबद्दल शॉकिंग खुलासे केले आहेत.
'कॉन्ट्रोवर्सी क्वीन' होती ही पाकिस्तानी अभिनेत्री; भारतात टॉपलेस फोटोशूट करत उडवून दिली खळबळ
सुनिधीने राज शामानीच्या पॉडकास्टमध्ये रिॲलिटी शोबद्दल खुलेपणाने चर्चा केली. गेल्या काही वर्षांपासून रिॲलिटी शोजवर हे शो स्क्रिप्टेड असून त्यांचे विजेते आधीच ठरवले जात असल्याचा खुलासे केले आहेत. आता स्वत: प्रसिद्ध सिंगिंग रिॲलिटी शोची जज राहिलेली सुनिधी चौहान आता शोमध्ये होणाऱ्या या आरोपांबद्दल उघडपणे बोलली आहे.
advertisement
जेव्हा होस्टने सुनिधीला विचारले की, तुला असे वाटते की रिॲलिटी शो आता खरे नाहीत, तेव्हा सुनिधी सहमत झाली आणि म्हणाली, 'रिॲलिटी शो आता खूप बदलले आहेत, पण पूर्वी असं नव्हतं. तुम्हाला आठवत असेल तर पहिल्या दोन सीझनमध्ये एकही स्टोरी नसायची. मस्ती व्हायची, कुणीतरी वाईट गायक यायचे, ज्यांना आम्ही म्हणायचो, तू पुढच्या सिझनला ये. हे सर्व स्क्रिप्टेड असायचं. पण, तुम्ही जे ऐकत आहात तेच खरं असायचे.'
advertisement
सुनिधी पुढे म्हणाली, 'पण, आता तुम्ही टीव्हीवर जे काही बघता ते सर्व स्क्रिप्टेड असतं.' असा खुलासा केला आहे.
तो पुढे म्हणाला, 'या सर्व गोष्टींचा मला त्रास होऊ लागला, त्यामुळे मी रिऍलिटी शोमध्ये भाग घेणं बंद केलं. मग मी 'द व्हॉईस' केला, ज्यामध्ये मी माझ्या काही अटी ठेवल्या आणि त्यांनीही माझ्या अटी मान्य केल्या. त्या शोमध्ये मी जे काही ऐकत होते ते प्रेक्षकांनाही ऐकू येत असल्याचं समाधान होतं. मला ही फसवणूक सहन होत नाही, म्हणून मी या शोचा भाग होते याचा मला आनंद आहे, पण आता मी या शोचा भाग नाही. हे 'ऐ दिल है हिंदुस्तानी' या शोसारखे आहेत.' असा खुलासा केला आहे. तसेच यावेळी सुनिधी अनेक गायक ऑटो ट्यून वापरतात त्यावरही भाष्य केलं आहे. ती म्हणाली, 'अनेक गायक स्टेजवर गाताना देखील साउंडचा वापर करतात.' असा देखील खुलासा केला.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'सगळं स्क्रिप्टेड असतं, सगळे ऑटोट्यून...' बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिकेनं केली इंडस्ट्रीची पोलखोल
Next Article
advertisement
Dharashiv News: तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळल्या!
तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु
  • तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु

  • तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु

  • तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु

View All
advertisement