Suraj Chavan : हे काय स्वप्न नाही..! सुरज चव्हाणने शेअर केला मिस्ट्री गर्लसोबतचा खास फोटो, नेटकऱ्यांची उत्सुकता शिगेला
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Suraj Chavan with Mystery Girl : बिग बॉस मराठी ५ विजेता सूरज चव्हाणच्या प्रेमाची चर्चा पुन्हा रंगली आहे. पुन्हा एकदा सूरजच्या आयुष्यात प्रेमाची एंट्री झाली आहे की काय, अशा चर्चांना उधाण आलं आहे.
मुंबई : ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाण त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. बिग बॉसच्या घरात असताना त्याने अनेकदा त्याच्या प्रेमभंगाबद्दल सांगितलं होतं. त्याच्या ‘गुलिगत धोका’ या शब्दाने तर सगळ्यांना वेड लावलं होतं. आता पुन्हा एकदा सूरजच्या आयुष्यात प्रेमाची एंट्री झाली आहे की काय, अशा चर्चांना उधाण आलं आहे. त्याने सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो याच चर्चांना कारण बनला आहे.
फोटोतील ‘ती’ मुलगी कोण?
सूरजने नुकताच एका मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे, ज्यात दोघेही पारंपरिक दाक्षिणात्य पेहरावात दिसत आहेत. या फोटोमध्ये त्या मुलीने तिचा चेहरा झाकलेला आहे, पण सूरजने फोटोला हार्ट इमोजीचं कॅप्शन दिलं आहे. यामुळेच अनेक जण अंदाज लावत आहेत की, ही मुलगी सूरजची नवी प्रेमिका आहे.
advertisement
‘बिग बॉस’च्या घरात असताना सूरज त्याच्या पिल्लूबद्दल बोलताना दिसला होता. आता त्याने ही नवी पोस्ट शेअर केल्याने, अनेकांनी त्याचं अभिनंदन केलं आहे.
सूरजचा ‘झापुक झुपूक’ चित्रपट फ्लॉप!
बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणने मोठ्या पडद्यावरही पदार्पण केलं होतं. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘झापुक झुपूक’ या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारली होती. २५ एप्रिल २०२५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण, चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला नाही आणि चित्रपट फ्लॉप ठरला, ज्यामुळे सूरज आणि केदार शिंदे दोघांनाही खूप मोठा धक्का बसला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 8:04 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Suraj Chavan : हे काय स्वप्न नाही..! सुरज चव्हाणने शेअर केला मिस्ट्री गर्लसोबतचा खास फोटो, नेटकऱ्यांची उत्सुकता शिगेला