advertisement

Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस' च्या घरात राखी सावंतने केली तोडफोड; घाण पाहून भडकली ड्रामा क्वीन

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant Sagar Karande Fight : बिग बॉस मराठी 6 च्या घरात राखी सावंतने तोडफोड करत नियमभंग केला आहे. त्यामुळे आता नवा ड्रामा पाहायला मिळणार आहे.

News18
News18
'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन ड्रामा क्वीन राखी सावंतची एन्ट्री झाल्यापासून चांगलाच रंगात आला आहे. राखी घरातील सदस्यांची एकमेकांशी भांडणं लावून देताना दिसते आहे. सदस्यांमध्ये आग लावता लावता राखी एका गोष्टीवरून स्वत:च पेटली आहे. बिग बॉसच्या घरात तिने घाण पाहिली आणि तिचा राग अनावर झाला. तिने बिग बॉसच्या घरात तोडफोड केली आहे.
बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात राखी घरात तोडफोड करताना दिसते आहे. सुरुवात सागरसोबतच्या वादाने झाली आहे. राखी आणि सागरमध्ये वाद होतो. घरातील साफसफाईवरून हा वाद झालेला दिसतो आहे.
advertisement
बाथरूममध्ये घाण झालेली आहे. राखी सागरला ते दाखवते आणि हे स्वच्छ करा असं सांगते. पण सागर साफसफाई करायला थेट नकार देतो. सागर राखीला म्हणतो, "तू मला सांगू नकोस. मी वॉचमन नाही. मी साफ करणार नाही" यानंतर राखी भडकून म्हणते, "हे तुम्हाला करावं लागेल. आम्ही पण जेवण बनवतो ना. ते खाता ना तुम्ही? मग नाटकं का करता?" असं बोलून राखी वॉशरूम एरियाच्या बाहेर येते आणि रागात किचनमध्ये जाते. तिथं येऊन ती काचेची वस्तू फोडते.
advertisement
यावर सगळे राखीला ओरडताना दिसतात. तू असं नाही करू शकत, तोडफोड नाही करू शकत असं सांगता.  'बिग बॉस'च्या घरातील कोणतीही वस्तू फोडणं हा नियमभंग आहे. राखीने हा नियम मोडला आहे. त्यामुळे आता घरात कोणता ड्रामा पाहायला मिळणार याची उत्सुकता आहे.
advertisement
advertisement
दरम्यान नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. राखीने गेम एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलाय, राखी आली तेव्हापासून शो वेगळ्याच लेव्हलला गेलाय, जे कॅमेऱ्यासमोर येत नव्हतं तेसुद्धा शोमध्ये दिसू लागलेत, राखीमुळे बिग बॉस‍ पाहायला मजा येतेय, राखी बोलते सबको कोलते, राखीने सागरचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला, वाह एक नंबर आता खरी मजा येणार शो पाहायला, राखीने वाट लावलीये सर्वांची, अशा कमेंट या प्रोमोवर आल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस' च्या घरात राखी सावंतने केली तोडफोड; घाण पाहून भडकली ड्रामा क्वीन
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement