Bigg Bossचेही शब्द फिरवलेस! विशालला घरात राहण्याचा अधिकार आहे का? राकेश बापटची बहीण संतापली
- Published by:Minal Gurav
Last Updated:
राकेश बापटची बहीण शीतल बापट हिनेही उघडपणे विशालवर टीका करत संताप व्यक्त केला आहे.
बिग बॉस मराठी 6 च्या घरात तिकिट टू फिनाले टास्कदरम्यान मोठा वाद झाला. या टास्कमध्ये नॉमिनेशनदरम्यान अभिनेता राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्यात जोरदार भांडण झालं. हा वाद इतका वाढला की तो थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. या वादात दोघांनीही एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोट दाखवलं. बिग बॉसच्या घरात वैयक्तिक गोष्टी काढण्यास मनाई असताना ही मर्यादा ओलांडल्यामुळे बिग बॉसही संतापले. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बिग बॉसने दोघांनाही शिक्षा सुनावली. विशालच्या वागण्यावर राकेश बापटची बहिण संतापली आहे.
या घटनेनंतर बाहेर प्रेक्षकांमध्ये हिच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर राकेश बापटला मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय. अनेक चाहत्यांनी विशाल कोटियनच्या वागण्यावर टीका केली असून त्याला ट्रोल केलं जात आहे. आता राकेश बापटची बहीण शीतल बापट हिनेही उघडपणे विशालवर टीका करत संताप व्यक्त केला आहे. तिने फोकस इंडिया करण सोनावणेचा व्हिडीओ शेअर करत विशालच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
advertisement
( Bigg Boss Marathi 6 : राकेशसोबत राडा! तरी RB ची बहीण देणार विशालसाठी 'खास गिफ्ट'; 'तुला एक किलो...' )
शीतल बापटने तिच्या पोस्टमध्ये थेट विशालला चांगलंच सुनावलं आहे. शितल यांनी लिहिलंय, "आज तू अगदी खालच्या पातळीवर गेलास. PERSONAL या शब्दाचा अर्थ तुला खरंच कळतो का? बिग बॉसच्या अग्रीमेंटच्या अटींनुसार कोणत्याही स्पर्धकाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्यास बंदी आहे. मात्र विशालने या नियमांचं उल्लंघन केलं. शब्द फिरवणं आणि खोटं बोलणं हा तुझा पॅटर्न आहे. पण आज तू बिग बॉसचे शब्दही फिरवलेस.
advertisement
advertisement
शीतलने प्रेक्षकांनाही प्रश्न विचारला की, "अशा व्यक्तीला घरात राहण्याचा नैतिक किंवा कायदेशीर अधिकार आहे का?" शेवटी शितल यांनी विशालला टोला लगावत म्हटलं, "आणि लोक यालाच 'मास्टरमाइंड' म्हणतात".
राकेश आणि विशाल यांच्यातील हा वाद पुढे काय वळण घेतो. तसेच प्रेक्षकांची यावर आणखी काय प्रतिक्रिया देतात. बिग बॉसचा फिनालेपर्यंतचा प्रवास कसा असणार आहे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 31, 2026 1:33 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Bossचेही शब्द फिरवलेस! विशालला घरात राहण्याचा अधिकार आहे का? राकेश बापटची बहीण संतापली









